मोटोरोला ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. ज्यात ग्राहकांना नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स कंपनी ऑफर करते. कंपनीने भारतात आज आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मोटोरोला कंपनीने आज भारतात Edge 40 Neo स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यावर्षी मे महिन्यात लॉन्च झालेल्या Edge 40 या नंतरचा हा सिरीजमधील दुसरा स्मार्टफोन आहे. Moto Edge 40 Neo हा या सिरीजमधील परवडणारा स्मार्टफोन आहे. या लॉन्च झालेल्या फोनची किंमत, फीचर्स याबद्दल जाणून घेऊयात.

Moto Edge 40 Neo: फीचर्स

मोटोरोला एज ४० निओ या स्मार्टफोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा pOLED डिस्प्ले मिळणार आहे. तसेच या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १४४Hz इतका असणार आहे. तसेच डिस्प्लेचा सॅम्पलिंग रेट हा ३६० Hz इतका असणार आहे. हा डिस्प्ले कर्व्ह डिस्प्ले असून त्याचा पीक ब्राइटनेस हा १३०० नीट्स इतका आहे. मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०३० प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे . या चिपसेटसह लॉन्च होणार हा पहिला स्मार्टफोन आहे. वापरकर्ते हा फोन Caneel Bay, Black Beauty अणि Soothing Sea या तीन रंगामध्ये खरेदी करू शकतात. याबाबतचे वृत्त 91mobiles ने दिले आहे.

Syria,lebanon Israel,pagers pager blast
विश्लेषण : लेबनॉन पेजर स्फोटांमागे इस्रायल? पॅकिंगच्या वेळीच पेजरमध्ये स्फोटके पेरली?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Yamaha R15M Carbon Fibre launched
२००८ पासून मार्केट गाजवणारी Yamaha आता नव्या अवतारात दाखल; किंमत पूर्वीपेक्षा कमी, तर इंजिनचंही बदललं रूप
iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर
group of delivery boys fight into a housing society
‘डिलिव्हरी बॉय’च्या टोळक्याचा गृहनिर्माण सोसायटीत राडा
Gyanradha Multistate, cheated, arrest,
तब्बल ३,५१५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रमुखांना अखेर ठोकल्या बेड्या
Trademark Violation, namesake restaurant, pune,
व्यापार चिन्हाच्या उल्लंघनाचा वाद : पुण्यातील नेमसेक रेस्टॉरंटला बर्गर किंग नाव वापरण्यास तूर्त मज्जाव
Employees right not to work after office hours What would Australias Right to Disconnect law look like
कार्यालयीन वेळेनंतर काम न करण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार… कसा असेल ऑस्ट्रेलियातील ‘राइट टू डिस्कनेक्ट’ कायदा?

हेही वाचा : iPhone मध्ये इन्स्टाग्राम रिल्स डाउनलोड करायची ‘ही’ आहे सोपी पद्धत; VIDEO एकदा पाहाच

मोटोरोलाचा हा नवीन स्मार्टफोन ८/१२८ जीबी आणि १२/२५६ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Moto Edge 40 Neo च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये OIS सह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच त्यात १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देखील देण्यात आले आहे. व्हिडीओ आणि सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.या फोनला ६८W चार्जिंग स्पोर्टसह ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन केवळ १५ मिनिटांमध्ये ५० टक्के चार्ज होतो असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये IP68, 5G, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ड्युअल स्टिरिओ स्पिकर्स, डॉल्बी ऍटमॉस, NFC आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असे फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत आणि ऑफर्स

Moto Edge 40 Neo च्या ८/१२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे. तर १२/२५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २५,९९९ रुपये आहे. मोटोरोला मर्यादित काळासाठी हा फोन २०,९९९ रुपये आणि २२,९९९ रुपये या विशेष फेस्टिव्हल किंमतीत ऑफर करत आहे. या फोनची विक्री २८ सप्टेंबरपासून Flipkart आणि Motorola.in आणि रिटेल स्टोअर्सवर संध्याकाळी ७ पासून सुरु होईल. यावर १ हजारांचा एक्सचेंज बोनस किंवा बँक ऑफर्स उपलब्ध आहे.