Motorola एक लोकप्रिय मोबाइल कंपनीने आहे. कंपनीने भारतात आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मोटोरोलाने देशात Moto G14 हा फोन सादर केला आहे. हा फोन एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये आणि दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर या फोनमध्ये काय काय फीचर्स आहेत आणि याची किंमत याबद्दल जाणून घेऊयात.

Moto G14 : फीचर्स

Moto G14 मध्ये वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा फुल एचडी + एलसीडी डिस्प्ले मिळणार आहे. ज्यात सेल्फीसाठी पंच होल कट आऊट आहे. या फोनला nisoc T616 चिपसेट आर्म माली-G57 MPI GPU चा सपोर्ट देण्यात आला आहे. यात ४जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबी पर्यंत वाढवता येतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
thane accidental death Social activist Pushpa Agashe CCTV cameras teen hath naka
आगाशे यांच्या अपघाती निधनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
Royal Enfield Scram 440 price, features, and specifications in Marathi
नवीन वर्षात Royal Enfield चा धमाका! बुलेटप्रेमींनो धासू Scram 440 लाँच, किंमत फक्त इतकी: जाणून घ्या जबरदस्त फीचर्स
Komaki SE series electric scooters
Komaki SE series: सिंगल चार्जवर १२० किलोमीटरपर्यंतची रेंज; सुरक्षेसाठी ‘हे’ फीचर; भारतात लाँच झाली इलेक्ट्रिक स्कूटर
sambhav
भारतीय लष्कर वापरत असलेला संभव स्मार्टफोनमध्ये कोणत्या खास गोष्टी आहेत? जाणून घ्या…
Suzuki Access 125 price features amd more
स्कूटरप्रेमींनो, Suzuki Access 125 चे अपडेटेड व्हर्जन लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् सर्व काही
south suspense thriller movies
थरारक सीन्सच्या जोडीला आहेत चकित करणारे क्लायमॅक्स, मोफत पाहता येतील ‘हे’ चित्रपट

हेही वाचा : Meta चा मोठा निर्णय! ‘या’ देशामध्ये फेसबुक-इन्स्टाग्रामवर वाचता येणार नाहीत बातम्या, नेमके प्रकरण काय?

फोटोग्राफीसाठी यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप येतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फी व व्हिडिओसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. Moto G14 मध्ये वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. ज्याला २०W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा फोन पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP52 रेटिंगसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी, स्मार्टफोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, USB टाइप-सी पोर्ट, ड्युअल वाय-फाय, GPS, A-GPS आणि 4G LTE आहे.

Moto G14 : किंमत

Moto G14 हा फोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची किंमत ९,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन स्टील ग्रे आणि स्काय ब्लू या दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. मोटो जी १४ याची ८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडियाची अधिकृत वेबसाईट आणि किरकोळ स्टोअर्सवर उपलब्ध होईल. खरेदीदारांना ICICI बँकेच्या कार्डावर ७५० रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळेल.

हेही वाचा : एलॉन मस्क यांच्या नव्या लोगोची सगळीकडे हवा; आता TweetDeck ला केले रीब्रँड, ‘या’ नावाने ओळखले जाणार

याआधी मंगळवारी शाओमीने भारतात १० हजार रुपयांखालील नवीन स्मार्टफोन लॉन्च केला. Redmi 12 4G मध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा , ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि ६.७ इंचाचा डिस्प्ले व MediaTek Helio G88 12nm प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. भारतात ४ ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर त्याची विक्री सुरू होईल.

Story img Loader