Moto G Play (2021) Smartphone जानेवारी २०२१ मध्ये लाँच झाला होता. Moto G Play (२०२१) कंपनीने Snapdragon ४६० प्रोसेसरसह उपलब्ध करून दिला आहे. आता बातमी अशी आहे की Moto G Play (२०२२) स्मार्टफोनबद्दल बातम्या येऊ लागल्या आहेत. Moto G Play (२०२२) हँडसेटचे काही फोटो ऑनलाइन लीक झाली आहेत. नवीन लीकमध्ये आगामी मोटो स्मार्टफोनच्या डिझाइनची झलक दिसून आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

MediaTek Helio G37 प्रोसेसर Motorola च्या आगामी स्मार्टफोनमध्ये असू शकतो. नवीन मोटोरोला हँडसेटमध्ये १६ मेगापिक्सेल प्राइमरी सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ५०००mAh बॅटरी असू शकते.

( हे ही वाचा: Vodafone Idea च्या लाखो ग्राहकांना बसला धक्का; कंपनीने बंद केले Netflix, Prime, Hotstar चे प्लॅन)

Moto G Play (२०२२) तपशील

टिपस्टर इव्हान ब्लास (@evleaks) ने 91Mobiles च्या भागीदारीत Moto G Play (२०२२) चे फोटो आणि वैशिष्ट्ये लीक केली आहेत. लीक झालेल्या फोटोंवरून दिसून येते की डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेर्‍यासाठी होल-पंच कटआउट असेल. हा स्मार्टफोन नेव्ही ब्लू कलरमध्ये पाहता येईल. हँडसेटच्या मागील पॅनलवर, डावीकडे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. याशिवाय, हँडसेटच्या डाव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे आहेत.

लीकनुसार, Moto G Play (२०२२) अँड्रॉइड १२ सह लाँच केला जाईल. फोनमध्ये ६.५ इंचाचा IPS LCD डिस्प्ले असेल, ज्याचे रिझोल्यूशन ७२० x १६०० पिक्सेल असू शकते. आगामी मोटोरोला फोनमध्ये MediaTek Helio G37 प्रोसेसर, ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज सारखी वैशिष्ट्ये असू शकतात. याशिवाय, Moto G Play (२०२२) मध्ये १६ मेगापिक्सेल प्राइमरी रिअर आणि २ मेगापिक्सलचे दोन सेन्सर असू शकतात. मागील Moto G Play (२०२१) प्रमाणे, नवीन प्रकारात देखील ५०००mAh बॅटरी मिळण्याची अपेक्षा आहे. फोन १० वोल्ट फास्ट चार्जिंगसह येईल. हँडसेटला धूळ आणि पाण्याच्या रेजिस्टेंस IP52 रेटिंग मिळेल.

( हे ही वाचा: Google Maps वरून तपासा हवेची गुणवत्ता; सोप्या स्टेप्स जाणून घ्या)

Moto G Play (2021) स्मार्टफोन गेल्या वर्षी निवडक बाजारपेठांमध्ये रिलीज झाला होता. हा फोन मिस्टी ब्लू कलर ऑप्शनमध्ये $१६९.९९ (सुमारे १२,५०० रुपये) मध्ये येतो. Moto G Play (२०२१) स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा HD+ (७२०×१६०० pixels) डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon ४६० प्रोसेसर, ३जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आणि Adreno 610 GPU सारखी वैशिष्ट्ये आहेत. हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे जो १३ मेगापिक्सेल प्राइमरी आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह येतो. फोनमध्ये ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी, १०वोल्ट चार्जिंग सपोर्टसह ५०००mAh बॅटरी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moto g play 2022 smartphone images specifications online leaked to sport triple rear cameras gps