मोटोरोला ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी अत्याधुनिक फीचर्स आणि अपडेट असलेले स्मार्टफोन्स भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत असते. मोटोरोला कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Moto G84 5G भारतात लॉन्च केला आहे. मोटोरोलाच्या या लॉन्च झालेल्या नवीन स्मार्टफोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेट असलेला पोल्ड डिस्प्ले, १२८ जीबी रॅम आणि फास्ट चार्जिंगसाठी ३३ W चा सपोर्ट करणारी ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन वेगन (vegan ) लेदर फिनिशसह येतो. ज्यामुळे तो अधिक प्रीमियम दिसतो. या फोनची किंमत, फीचर्स याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Moto G84 5G : फीचर्स

मोटोरोला G84 5G स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा pOLED डिस्प्ले मिळतो. तसेच याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. तर १३००० नीट्स इतका ब्राइटनेस असणार आहे. हा फोन Qualcomm स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेट सपोर्टसह येतो. तसेच वापरकर्त्यांना या फोनमध्ये कंपनीने २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज ऑफर करते.हा फोन अँड्रॉइड १३ सह येतो. मात्र याला अँडॉईड १४ चे अपडेट मिळणार आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

हेही वाचा : Kitchen Tips: घरच्या लोण्याला येणारा वास घालवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यात वापरकर्त्यांना ५० मेगापिक्सलचा OIS कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच Moto G84 5G मध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. तसेच ३३ W इतके फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. हा स्मार्टफोन मोटो Spatial ऑडिओ सपोर्टसह डॉल्बी ऍटमॉस स्पिकरसह येतो असा कंपनीचा दावा आहे.

किंमत आणि ऑफर्स

Moto G84 5G हा स्मार्टफोन एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीने १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केला आहे. याची किंमत १९,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन मार्शमॅलो ब्लूमध्ये प्रीमियन वेगन (vegan) लेदर फिनिशमध्ये आणि मिडनाईट ब्लूमध्ये 3D अॅक्रेलिक ग्लास फिनिशमध्ये उपलब्ध आहे. या फोनचा सेल ८ सप्टेंबरपासून भारतात दुपारी १२ वाजता Flipkart आणि Motorola.in वर सुरू होणार आहे. खरेदीदारांना ICICI बँक खरेदी कार्डवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. ज्यामुळे या फोनची किंमत १८,९९९ रुपये होते.