Motorola mid-range smartphone: सध्या स्मार्टफोनशिवाय आपलं कोणतचं काम होणं शक्य नाही आहे. त्यामुळे विविध कंपन्या नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन ग्राहकांसाठी घेऊन येत असतात. अशातच आता मोटोरोला कंपनी त्यांचा १८ व १९ हजारांचा स्मार्टफोन मार्केटमध्ये घेऊन आली आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव मोटो जी८५ ५जी (Motorola G85 5G) असे आहे. कंपनीने हा स्मार्टफोन लाँच करून भारतातील मिड-रेंज सेगमेंटचे अनावरण केलं आहे. या बेस व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये इतकी आहे. तर या स्मार्टफोनच्या डिस्प्ले, प्रोसेसर, कॅमेरा, डिझाईन बद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊ…

मोटो जी८५ डिस्प्ले (Motorola G85 Display) :

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल

२० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनमध्ये 3D curved poOLED डिस्प्ले देण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्मूथ व्हिज्युअल्ससह इमर्सिव्ह व्ह्यूइंग अनुभव देते. डिस्प्लेमध्ये १२० एचझेड रिफ्रेश रेट, ५००० एमएएच बॅटरी, गोरिला ग्लाससह येतो; जो बटरी-स्मूथ स्क्रोलिंग, गेमिंग, व्हिडीओ पाहण्याचा अनुभव खास करणार आहे.

मोटो जी८५ प्रोसेसर (Motorola G85 Processor) :

नवीन मोटो जी८५ स्नॅपड्रॅगन ६एस जेन ३ एसओसीसह येतो. मोटोरोला दोन रॅम कॉन्फिगरेशन ८ जीबी, १२ जीबी, २५६ जीबी स्टोरेजसह ऑफर करतो.

हेही वाचा…Amazon Prime Day sale: जबरदस्त ऑफर्स अन् भरपूर बक्षिसे; कधी सुरू होणार हा सेल? कोणत्या वस्तू खरेदी केल्यावर मिळेल सूट? घ्या जाणून

मोटो जी८५ कॅमेरा (Motorola G85 Camera) :

मोटो जी८५ ५जी मध्ये ओआयएस (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) सह ५० एमपी कॅपचरिंग शार्प, स्टेबल फोटो, व्हिडीओ कॅप्चर करण्यासाठी आहे. हे ८ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा तर सेल्फीसाठी ३२ एमपी कॅमेरा मिळेल.

मोटो जी८५ डिझाईन आणि रंग पर्याय (Design and Availability) :

मोटो जी८५ ५जी स्लिम प्रोफाइलसह तीन वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये येतो; यामध्ये ऑलिव्ह ग्रीन (व्हेगन लेदर), कोबाल्ट ब्लू (वेगन लेदर) आणि अर्बन ग्रे (ऍक्रेलिक ग्लास) आदी पर्यायांसह येतो.

खरेदीसाठी कधी होणार उपलब्ध ?

मोटो जी८५ ५जी स्मार्टफोन १६ जुलैपासून फ्लिपकार्ट, मोटोरोला डॉट इन (Motorola.in) आणि भारतातील आघाडीच्या रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेजसह बेस व्हेरिएंटची किंमत १७,९९९ तर २५६ जीबी स्टोरेजसह १२ जीबी रॅम व्हेरिएंट १९,९९९ रुपयांना मिळेल. तर अशाप्रकारे तुम्ही २० हजारांच्या आतमध्ये जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करू शकता.