Motorola ने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनचे नवीनतम मॉडेल लाँच केले आहे. Samsung च्या Galaxy Z Flip 4 लाँच झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कंपनीचा नवीनतम Moto Razr २०२२ स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. Motorola चा नवीनतम फोल्डेबल Razr 2022 स्मार्टफोन Qualcomm चा फ्लॅगशिप प्रोसेसर, ५० मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरे, ड्युअल डिस्प्ले आणि कंपनीच्या नवीनतम क्लॅमशेल रेझर डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. तर जाणून घेऊया Moto Razr 2022 स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीबद्दल.
Moto Razr 2022 किंमत
८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेजसह Moto Razr २०२२ स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत अंदाजे ७०,९५० एवढी आहे. यासोबतच, मोटोरोलाचा फोल्डेबल स्मार्टफोन ८जीबी रॅम + २५६जीबी स्टोरेज आणि १२जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज मध्ये अंदाजे ७६,८५० रुपये एवढा आहे. Moto Razr २०२२ स्मार्टफोन सोल ब्लॅक कलर मॉडेलमध्ये सादर करण्यात आला आहे. मोटोरोलाच्या फोल्डेबल स्मार्टफोनची बुकिंग चीनमध्ये सुरू झाली आहे. सध्या तरी हा फोन जागतिक बाजारपेठेत लाँच झालेला नाही.
( हे ही वाचा: ३ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय iPhone 13! लवकरच घरी आणा तुमच्या स्वप्नातला फोन)
Moto Razr 2022 तपशील
Moto Razr २०२२ स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon ८+ Gen १ प्रोसेसरसह १२ जीबी रॅमसह सादर करण्यात आला आहे. हा मोटोरोला फोनमध्ये ५१२जीबी स्टोरेज असेल. Moto Razr २०२२ स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा FHD + OLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले HDR१०+ आणि १४४Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मोटोरोलाच्या स्मार्टफोनमध्ये २.७ इंचाचा बाह्य डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले नोटिफिकेशनसाठी वापरता येतो. यासोबतच हा डिस्प्ले मागील कॅमेऱ्यातून सेल्फी क्लिक करताना देखील वापरता येतो.
कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर Moto Razr २०२२ मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये ५०एमपीचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये १३ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये ३२ एमपीचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. motorola Razr स्मार्टफोन Android १२ वर आधारित Motorola च्या MyUI 4.0 स्किनवर चालतो. या स्मार्टफोनला ३,५०० mAh बॅटरी आणि ३३ वोल्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर, डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट आहे.