दरवर्षी डिझायनर आणि ट्रेण्ड फोरकास्टर्स ‘पॅन्टोन’ कंपनीकडून जाहीर केल्या जाणाऱ्या वर्षांच्या नव्या रंगाची आतुरतेने वाट पाहत असतात. या कंपनीद्वारे जाहीर झालेला रंग ग्लोबली फक्त फॅशनच नाही तर प्रत्येक प्रॉडक्ट्मध्ये फॉलो केला जातो. ही कंपनी अनेक वर्षांपासून अशा पद्धतीने हे रंग जाहीर करते आहे. तर यंदा ‘पॅन्टोन’ कंपनीचे २५ वे वर्ष आहे. २०२४ या वर्षासाठी पॅन्टोनने, (The Pantone Color of the Year 2024) ‘पॅन्टोन १३-१०२३’ ‘पीच फझ’ (Peach Fuzz) या रंगाची घोषणा केली आहे.
मोटोरोला भारतातील सर्वोत्तम फायजी (5G) स्मार्टफोन ब्रॅण्ड आणि जागतिक कलर अथॉरिटी पॅन्टोन कंपनी बरोबर पार्टनरशीप करत पुन्हा एकदा युजर्ससाठी खास फोन आले आहेत ; यांच्या पार्टनरशीपचे हे दुसरे वर्ष आहे. पॅन्टोन कंपनीकडून ‘पॅन्टोन कलर ऑफ द इयर २०२४’ च्या ‘पॅन्टोन १३-१०२३’ ‘पीच फझ’ या रंगाच्या माध्यमातून मानवी संबंधांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. ‘पीच फझ’ या रंगामध्ये एक नाजूक भाव आहे. तर या या रंगाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मोटोरोला रेजर ४० अल्ट्रा (razr 40 ultra) आणि मोटोरोला एज ४० निओ (edge 40 neo) या स्मार्टफोन्सची निवड करण्यात आली आहे.
मोटोरोला रेजर ४० अल्ट्रा (Razr 40 ultra) :
मोटोरोला रेजर ४० अल्ट्रा (razr 40 ultra) लोकप्रिय स्मार्टफोन फ्लिप डिझाइनसह ३.६ इंचांचा आहे. तसेच हा जगातील सर्वांत मोठा डिसप्ले आहे. फोनच्या रिफ्रेश रेट १४४ एचझेड (144Hz) आहे, तर पीक ब्राइटनेस ११०० निट्स आहे. हा फ्लिप फोन उघडल्यानंतर ह्या फोनचा सुमारे ६.९ इंचांचा डिसप्ले दिसतो. त्याचा रिफ्रेश रेट १६५ एचझेड (Hz) आहे, तर पीक ब्राइटनेस १४०० निट्स आहे. अप्रतिम असा फ्लिप फोन स्नपॅड्रॅगन ८ प्लस जेन १ एसओसी ( 8+ Gen 1 SoC) ने सुसज्ज आहे. हा फोन यापूर्वी पॅन्टोन ‘कलर ऑफ द इयर २०२३’ मध्ये ‘विवा मजेंटा’ ह्या रंगात आणला गेला होता. त्याला ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. तर पीच फझ रंगातील स्मार्टफोनही लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा…‘या’ कंपनीने लाँच केले सिम कार्डयुक्त पहिले स्मार्टवॉच! काय असणार खास?
मोटोरोला एज ४० निओ (Edge 40 Neo) :
मोटोरोला एज ४० निओ (Edge 40 Neo) या मोबाईलवर . ‘पॅन्टोन १३-१०२३’ पीच फझ हा रंग सुंदररित्या शोभून दिसत आहे. हा स्मार्टफोन जगातील सर्वांत कमी वजनाचा फायजी (5G) फोन आहे. यामध्ये असणारे आयपी ६८ (IP68) पाण्यापासून मोबाइलचे संरक्षण करते; त्यामुळे या फ़ोनवर धूळ, घाण, माती यांचाही परिणाम होत नाही. १.५ मीटर खोल पाण्यात हा फोन बुडाल्यास ३० मिनिटांपर्यंत त्याला काहीही होत नाही. शिवाय ह्या फोनचा १४४ एचझेड (144Hz) ६.५५ ( 6.55) इंचांचा pOLED कर्व्ह्ड डिसप्ले व ब्राइटनेससाठी अनुकूल आहे. ह्या फोनचा रिफ्रेश रेट १४४ एचझेड (144Hz) आहे. जगातील पहिला ७०३० हा अतिजलद प्रोसेसर यात आहे. त्यातील ६एनएम 6nm चिपसेट, वाय-फाय ६ ई (6E) अनुकूल आहे. त्यामुळे त्याचा वेग अविश्वसनीय आहे. त्यातील मीडियाटेक हायपरइंजिन तंत्रज्ञान गेमिंगचा उत्तम अनुभव देते.
मोटोरोलामधील डिझाइन विभागाचे प्रमुख रुबेन कॅस्टानो या पार्टनरशिपबद्दल म्हणाले की, ग्राहकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडून ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मदत करण्याच्या मोटोरोलाच्या उद्दिष्टाच्या दृष्टीने ‘पॅन्टोन १३-१०२३’ पीच फझ हा रंग पूरक आहे. ‘पॅन्टोन १३-१०२३’ पीच फझ या रंगासाठी मोबाईल निवडताना मोटोरोलाने, मोटोरोला रेजर ४० अल्ट्रा आणि मोटोरोला एज ४० निओ ही उपकरणे ह्यासाठी उत्तम ठरतील, असा निर्णय घेतला.
पॅन्टोन कलर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष लॉरी प्रेसमन म्हणाल्या की, मोटोरोलासोबत आमचा काम करण्याचा अनुभव उत्तम आहे. यावर्षीचा रंग मानवीसंबंध, भावना व व्यक्तिगत हिताची जोपासना करण्यास विशेषत्वाने महत्त्व देणारा आहे. ‘पॅन्टोन १३-१०२३’ पीच फझ हा आमचा पॅन्टोन कलर ऑफ द इयर २०२४ मध्ये ग्राहक मोटोरोला देत असणाऱ्या सुविधांचा उपयोग कसा करतात हे बघणे आमच्यासाठी उत्तम अनुभव ठरणार आहे, असे त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे. तर मोटोरोला रेजर ४० अल्ट्रा आणि मोटोरोला एज ४० निओ भारतीय बाजारपेठेत लवकरच पॅण्टोन कलर ऑफ द इयर २०२४ मध्ये उपलब्ध होणार आहेत.