बार्सिलोनो येथे या वर्षातील सर्वात मोठा मोबाईल शो होत आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस म्हणजेच MWC 2023 हा शो आज म्हणजेच २ मार्च रोजी संपणार आहे. या शो मध्ये अनेक कंपन्यांनी आपली प्रॉडक्ट लॉन्च केली आहेत. चिनी कंपनी असणाऱ्या Xiaomi ने Xiaomi 13 ही सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीज अंतर्गत शाओमीने Xiaomi 13, 13 Pro आणि 13 Lite हे स्मार्टफोन्स बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. तसेच या शो मध्ये Motorola ने देखील आपला Motorola Rizr हा रोलेबल कन्सेप्ट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामधले खास फिचर हे त्याच्या डिस्प्लेमध्ये आहे. कारण याच्या डिस्प्लेमध्ये अनेक चांगले आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२३ या शो मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या मोटोरोला कन्सेप्ट स्मार्टफोनचे डिझाईन २००६ मध्ये झालेल्या Motorola Rizr Z3 प्रमाणेच करण्यात आले आहे. २००६ मध्ये एक स्लाईडिंग डिस्प्ले वापरण्यात आला होता. नवीन Motorola Rizr या स्मार्टफोनमध्ये ऑटोमॅटिक रोल करण्यासाठी योग्य डिस्प्ले टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
काय आहेत फीचर्स ?
या शो मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या डिव्हाईसचा एक लहान व्हिडीओ बेन वूडने शेअर केला आहे. हा फोन लहान डिस्प्लेसह लॉन्च करण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. Android Authority च्या रिपोर्टनुसार या फोनमध्ये ५ इंचाचा POLED डिस्प्ले आहे ज्याचा आस्पेक्ट रेशो १५.९ इतका आहे. मात्र फोन रोल आऊट केला की त्याचा डिस्प्ले ६.६ इंचाचा होतो ज्याचा आस्पेक्ट रेशो २२.९ इतका आहे.
तसेच तुम्ही या फोनच्या पॉवर बटणावर डबल क्लीक केले असता डिस्प्ले मोठा होयला लागतो. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वापरकर्ते स्वतःच्या आवडीनुसार याचा डिस्प्ले अड्जस्ट करू शकतात. तसेच फोन रोल होत नसल्यास फोनच्या डिस्प्लेला सेकंडरी डिस्प्ले म्हणून वापरता येऊ शकतो. फोनच्या मागच्या बाजूस ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.