मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन Motorola Edge 30 Pro भारतात प्रथमच आज म्हणजेच ४ मार्च २०२२ रोजी खरेदी करण्याची संधी आहे. Motorola Edge 30 Pro आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि इतर किरकोळ स्टोअरमधून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. Motorola Edge 30 Pro गेल्या आठवड्यात भारतात लॉंच करण्यात आला. Motorola Edge 30 Pro च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात स्नॅपड्रॅगन ८ Gen १ प्रोसेसरसह ६८W फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. याशिवाय, यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे.
कींमत किती?
Motorola Edge 30 Pro ची किंमत ४९,९९९ रुपये आहे. ही किंमत ८ GB रॅम सह १२८ GB स्टोरेजची आहे. हा फोन कॉसमॉस ब्लू आणि स्टारडस्ट व्हाइट रंगात खरेदी करता येईल. तुम्ही एसबीआय (SBI) क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला रु. ५,००० चा कॅशबॅक मिळेल. जिओ (Jio) ग्राहकांना १०,००० रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील.
(हे ही वाचा: WhatsApp ने जानेवारी २०२२ मध्ये १८.५८ लाख भारतीय खात्यांवर घातली बंदी, कारण…)
स्पेसिफिकेशन काय?
Motorola Edge 30 Pro मध्ये Android 12 आहे. यात 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि १४४Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा फुल HD+ POLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले २.५D वक्र गोरिल्ला ग्लास ३ द्वारे संरक्षित आहे, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ Gen १ प्रोसेसरसह ८ GB LPDDR5 रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे.
(हे ही वाचा: Facebook, Twitter वर ऑटो प्ले व्हिडीओ कसे बंद करायचे? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)
कॅमेरा कसा आहे?
या मोटो फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स ५० मेगापिक्सेल आहे, ज्यामध्ये ऍपर्चर f/१.८ आहे. लेन्स सर्व-दिशात्मक ऑटोफोकससह येते. याशिवाय, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) देखील समर्थित आहे. या फोनमधील दुसरी लेन्स ५० मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगलची आहे आणि तिसरी लेन्स २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. फोनवरून २४fps वर ८K व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो. पुढे ६० मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
(हे ही वाचा: Google Maps चं जबरदस्त फिचर! इंटरनेट नसतानाही दाखवेल मार्ग, जाणून घ्या कसं)
बॅटरी बॅंकअप कसा आहे?
कनेक्टिव्हिटीसाठी, Motorola Edge 30 Pro मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth v5.2, GPS/A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये Dolby Atmos च्या समर्थनासह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत. यात तीन मायक्रोफोन आहेत. फोनला IP52 रेटिंग मिळाली आहे. Motorola Edge 30 Pro 68W टर्बोपॉवर जलद चार्जिंगसाठी समर्थनासह 4800mAh बॅटरी पॅक करते. अवघ्या १५ मिनिटांत ५० टक्के बॅटरी चार्ज होईल, असा दावा केला जात आहे. फोनसोबत १५W वायरलेस चार्जिंग देखील उपलब्ध असेल.