Motorola Edge 30 Pro स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. फोनची वैशिष्ट्ये आणि डिझाइन गेल्या आठवड्यात ऑनलाइन लीक झाले होते. हा स्मार्टफोन Motorola Edge X30 चं रिब्रांडेड वर्जन असल्याचं बोललं जात आहे. गेल्या महिन्यात हा फोन चीनमध्ये लाँच झाला होता. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन १ प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. असं असलं तरी हा फोन Edge X30 पेक्षा वेगळा असेल असा दावा काही लीकर्सनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

91Mobiles च्या अहवालानुसार, Motorola कंपनी फेब्रुवारीमध्ये Motorola Edge 30 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की हा फोन भारतात वेगळ्या नावाने विकला जाईल. चीनमध्ये Moto Edge X30 नावाने सादर करण्यात आला होता. Motorola Edge 30 Pro जर Motorola Edge X30 ची रिब्रँडेड आवृत्ती असेल, तर त्याची वैशिष्ट्ये देखील एकसारखी असू शकतात. फोनमध्ये ६.८ इंचाचा फुल एचडी + (१,०८०x२४०० पिक्सेल) POLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, आस्पेक्ट रेशो १४४ एचझेड रिफ्रेश रेट आणि एचडीआर १० प्लस सपोर्टसह असेल. याशिवाय, फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ८ जेन १ प्रोसेसर असेल, ज्यामध्ये १२ जीबीपर्यंत रॅम मिळू शकेल.

फेसबुकचं युजर्ससाठी नवं फिचर; मॅसेंजरमधून कुणी तुमच्या मॅसेजचा स्क्रिनशॉट घेतला तर मिळणार नोटीफिकेशन

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा असू शकतो. ५० मेगापिक्सलचा वाइड-एंगल सेन्सर आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह असेल. फोनमध्ये ६० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याची बॅटरी ५००० एएचची असेल. ६९ वॅट टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकेल.