Motorola एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी आधुनिक फीचर्स असलेले स्मार्टफोन लॅान्च करत असते. मोटोरोलाने Edge 40 सिरिजमधील पहिला स्मार्टफोन भारतात लॅान्च केला आहे. या स्मार्टफोनला मागील महिन्यात युरोपमध्ये लॅान्च करण्यात आले होते. हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता.
Motorola Edge 40 ची किंमत
या लेटेस्ट मोटोरोलाच्या स्मार्टफोनची किंमत ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटसाठी कंपनीने २९,९९९ रुपये ठेवली आहे. हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. कंपनी आजच्या सेलमध्ये Axix बँकेच्या कार्डवर ५ टक्क्यांचा कॅशबॅक देत आहे. बाय विथ एक्सचेंज या अंतर्गत अतिरिक्त २,००० रुपयांची सूट मिळत आहे. मोटोरोलाचा हा फोन खरेदी करताना रिलायन्स जिओकडून ३,१०० रुपयांचे अतिरिक्त फायदे देखील मिळू शकतात. या ऑफर अंतर्गत १,००० रुपयांचा १०० जीबी अतिरिक्त ५जी डेटा मिळू शकतो. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
Motorola Edge 40 चे फीचर्स
मोटोरोलाने त्यांच्या नवीन मोबाईनमध्ये अनेक भन्नाट फिचर्स दिले आहेत. या मोबाईलमध्ये 6.55 इंच FHD आणि कर्व्ड OLED डिस्प्ले उपलब्ध करून देण्यात आला आहे.हा डिस्प्ले 144hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. यामुळे डिस्प्लेची गुणवत्ता चांगली मिळते. हा मोबाईल IP68 च्या रेटिंगसोबत उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे माती, धूळ आणि पाण्यातही खराब होत नाही. मोटारोलाने त्यांच्या एक ट्विटमध्ये सांगितले की, हा मोबाईल 30 मिनिटापर्यंत पाण्यात राहिला तरी फोनला काहीच होत नाही.
फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात प्रायमरी लेन्स ५० मेगापिक्सलचा आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशन OIS मिळते. दुसरा लेन्स १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळते. फ्रंट मध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळते. सोबत 68W TurboPower वायर चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो.