Motorola एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी आधुनिक फीचर्स असलेले स्मार्टफोन लॅान्च करत असते. आता पुढील आठवड्यामध्ये मोटोरोला आपला Edge 40 सिरिजमधील पहिला स्मार्टफोन भारतात लॅान्च करणार आहे. या स्मार्टफोनला मागील महिन्यात युरोपमध्ये लॅान्च करण्यात आले होते. भारतात सादर केला जाणाऱ्या या फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबद्दल जाणून घेऊयात.

Motorola Edge 40 चे फीचर्स

Motorola Edge 40 या फोनच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास ६.५५ इंचाचा FHD+ pOLED डिस्प्ले दिला जाऊ शकत्तो. ज्याचे रिझोल्युशन हे १०८०x२४०० इतके असू शकते. याचा रिफ्रेश रेट हा १४ Hz इतका असण्याची शक्यता आहे. तसेच या फोनमध्ये MediaTek Dimensity 8020 चिपसेटच्या प्रोसेसरचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच फोनला ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले जाऊ शकते. तसेच यामध्ये २५६ जीबी इतके इंटर्नल स्टोरेज दिले जाऊ शकते.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
Most robotic surgeries performed by Tata hospital in shortest time
टाटा रुग्णालयाकडून कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया
Deepika Padukone And Ranveer Singh Spotted with baby dua after delivery video viral
Video: पहिल्यांदाच लाडक्या लेकीबरोबर दिसले दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंह, एअरपोर्टवरील व्हिडीओ होतोय व्हायरल
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल
sussane khan share photo of son hridaan and hrehaan
हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”

हेही वाचा : खूशखबर! आता पर्सनल चॅट्स दुसऱ्यांपासून लवपता येणार, WhatsApp ने लॉन्च केलेले ‘हे’ फिचर एकदा पाहाच

कॅमेरा आणि बॅटरी

Motorola Edge 40 या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा व दुसरा हा १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सपोर्ट आसरा कॅमेरा दिला जाऊ शकतो.तसेच वापरकर्त्यांना सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देणार येऊ शकतो. तसेच बॅटरी ही ४६०० mAh क्षमतेची आणि त्याला ६८ W चे चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

किंमत व कधी होणार लॉन्च ?

Motorola Edge 40 हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर आधारित असणार आहे. अँड्रॉइड १४ चा सपोर्ट या फोनमध्ये मिळणार आहे. मात्र त्याबद्दल अधिकृत सांगण्यात आलेले नाही. हा स्मार्टफोन २३ मे रोजी लॅान्च होणार आहे. फोनची किंमत ही अंदाजे ४५,००० रुपये असण्याची शक्यता आहे. सध्या मोटोरोला एज ३० फ्युजनची किंमत ३९,९९९ रुपयांपासून सुरु होते. Edge 30 Ultra ची किंमत ४९,९९९ रुपये आहे. हा फोन तुम्ही ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.