Motorola या मोबाइल कंपनीने आपले दोन नवीन स्मार्टफोन बाजारामध्ये लॉन्च केले आहेत. कंपनीने लॉन्च केलेले हे दोन्ही फोन फोल्डेबल स्वरूपातील फोन्स आहेत. Motorola ने नवीन Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra he फोल्डेबल फोन्स सादर केले आहेत. या दोन्ही फोन्सवर अनेक बँकाच्या ऑफर्स आणि टेलिकॉम प्रदात्यांकडून डिस्काउंट देखील मिळत आहे. या फोनची किंमत, फीचर्स आणि ऑफरबद्दल जाणून घेऊयात.

Moto Razr 40 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मोटो Razr 40 Ultra या फोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये समोरील आणि मागील बाजूस गोरिला ग्लास व्हिक्टसचे संरक्षण आणि स्क्वेरिश क्लॅमशेल डिझाइन देण्यात आले आहे. तसेच यात ७००० ऍल्युमिनिअम फ्रेम देखील मिळते. वापरकर्त्यांना यामध्ये ६.९ इंचाचा फोल्डेबल फुल एचडी प्लस pOLED १० बीट डिस्प्ले मिळणार आहे. या डिस्प्लेमध्ये १४०० नीट्सचा ब्राईटनेस आणि १६५ Hz इतका रिफ्रेश रेट मिळणार आहे.

ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
child fell down from the scooter while his mother was driving it viral video on social media
आईची एक चूक पडली महागात! स्कूटर चालवताना चिमुकला रस्त्यावर पडला अन्…, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

हेही वाचा : लॉन्च होण्यापूर्वीच Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, काय असू शकते किंमत?

तसेच या फोनमध्ये वापरकर्त्यांना ३.६ इंचाचा फ्लेक्सिबल AMOLED आऊटर डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये ११०० नीट्सचा ब्राईटनेस, १४४ Hz इतका रिफ्रेश रेट आणि ३६० Hz इतका टच सॅम्पलिंग रेट, App सपोर्ट ,Moo लाईव्ह एडेप्टिव वॉलपेपर असे काही फीचर्स मिळणार आहेत. तसेच हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटला सपोर्ट करेल. यात ८ जीबी इतकी LPDDR5 रॅम आणि २५६ जीबी इतके UFS 3.1 स्टोरेज मिळेल.

या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे झाले तर यात रिअर कॅमेऱ्यामध्ये १२ MP चा सोनी IMX563 प्रायमरी सेन्सर, १३ MP चा अल्ट्रावाईड SK Hynix Hi1336 सेन्सर मिळणार आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी ३२ MP चा कॅमेरा मिळेल. तसेच बर्स्ट शॉट, ऑटो नाईट विजन, डुअल कॅप्चर असे फीचर्स कॅमेऱ्यामध्ये वापरकर्त्यांना मिळणार आहेत.

मोटो Razr 40 Ultra मध्ये ३८०० mAh क्षमतेची बॅटरी आणि ३०W चे टर्बो पॉवर फास्ट वायर्ड चार्जिंग व ५ W चे वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ५जी ड्युअल नॅनो सिम आणि इ-सीमाचा सपोर्ट , वायफाय ६, ब्लूटूथ 5.3, NFC, USB Type-C असे फीचर्स मिळतात. फोनमध्ये अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिटीम देण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त फीचर्समध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट रीडर, स्टिरिओ स्पिकर्स हे फिचर मिळतात. हा फोन ग्राहक Infinite Black, Glacier Blue, Viva Magenta (Pantone 2023) स्पेशल एडिशन या रागांमध्ये खरेदी कृ शकणार आहेत.

हेही वाचा : Weekly Tech Updates: प्रसिद्ध कंपनीच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयापासून ते Google ने केलेल्या AI टूल्सच्या घोषणेपर्यंत; टेक क्षेत्रातील ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी

Moto Razr 40 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Moto Razr 40 हा फोल्डेबल फोन कंपनीने लॉन्च केला आहे . यामध्ये समोरील आणि मागील बाजूस गोरिला ग्लास व्हिक्टसचे संरक्षण आणि स्क्वेरिश क्लॅमशेल डिझाइन देण्यात आले आहे. तसेच यात ७००० ऍल्युमिनिअम फ्रेम देखील मिळते. तसेच यामध्ये Razr 40 Ultra सारखाच आतील बाजूचा डिस्प्ले पाहायला मिळतो. तर १.५ इंचाचा ८ बीट OLED बाहेरील डिस्प्ले देण्यात आला आहे. वापरकर्त्यांना या फोनमध्ये ८ जीबी LPDDR4x रॅम मिळेल. तसेच २५६ जीबीचे UFS 2.2 इंटर्नल स्टोरेज मिळेल. तसेच रिअर कॅमेऱ्यामध्ये ६४ मेगापिक्सलचा ऑटो फोकससह प्रायमरी कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.

किंमत आणि ऑफर्स

Business Today च्या वृत्तानुसार, Motorola Razr 40 Ultra हा फोन कंपनीने ८९,९९९ रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तर व्हॅनिला Razr 40 हा फोन ग्राहकांना ५९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे दोन्ही फोल्डेबल फोन्स केवळ Amazon द्वारेच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. ICICI बँक डेबिट/क्रेडिट/ EMI द्वारे व्यवहार केल्यास ग्राहकांना त्वरित डिस्काउंट मिळू शकतो. Moto Razr 40 Ultra वर ७ हजार रुपयांचा त्वरित डिस्काउंट सुरु आहे. तर Razr 40 साठी ५ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय खरेदीदारांना १५ हजार रुपयांपर्यंतच्या जिओ ऑफरचा देखील लाभ घेऊ शकतात.