Motorola ने नवीन 5G व्हेरिएंटमध्ये नवीन स्मार्टफोन सादर केला आहे तो एक लेटेस्ट मॉडेल आहे. हा स्मार्टफोन स्टायलस पेन सपोर्टसह येतोय. मोटोरोला कंपनीने Moto G Stylus 2022 स्मार्टफोन ९० Hz रिफ्रेश रेट, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह लॉंच केला आहे. Moto G Stylus 2022 मध्ये प्रीलोडेड Moto Note अॅप आहे, ज्यामध्ये तुम्ही फोन अनलॉक न करताही स्टायलस वापरून नोट्स लिहू शकता. याशिवाय, तुम्ही प्रीलोडेड कलरिंग बुक अॅपवरही चित्र काढू शकता.
एकदा चार्ज केल्यावर बॅटरी दोन दिवस चालेल
या स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, सोबतच १० W चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हे डिव्हाईस एका चार्जवर दोन दिवस टिकू शकते. या डिव्हाईसच्या किंमतीबद्दल माहिती देताना मोटोरोलाने असेही म्हटले आहे की, Moto G Stylus 2022 ची किंमत $२९९.९९ (जवळपास २२,४०० रुपये) मध्ये उपलब्ध आहे. ही किंमत ६ GB RAM + १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी उपलब्ध आहे. फोनमध्ये मेटॅलिक रोज आणि ट्वायलाइट ब्लू कलरचे पर्याय देण्यात आले आहेत.
आणखी वाचा : OnePlus Nord 2 CE Lite 5G चे स्पेसिफिकेशन लीक झाले, जाणून घ्या सविस्तर…
Moto G Stylus 2022 स्पेसिफिकेशन
Moto G Stylus 2022 हा स्मार्टफोन Android 11 द्वारे समर्थित आहे. यात ६.८ इंचाचा फुल-एचडी + (१०८०x २,४६०पिक्सेल) मॅक्स व्हिजन IPS डिस्प्ले आहे, जो ९० Hz रिफ्रेश रेटसह येतो. याशिवाय फोनमध्ये Octa-core MediaTek Helio G88 प्रोसेसर आहे. हे ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजसह सिंगल सिम नॅनो स्लॉट देण्यात आला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे.
आणखी वाचा : Vivo चा नवीन T सीरीज स्मार्टफोन ९ फेब्रुवारीला होणार लॉंच, सलग २० तास चालवूनही बॅटरी लो होणार नाही
Moto G Stylus 2022 स्मार्टफोनसाठी Amazon, Flipkart आणि Motorola च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तर गेल्या वर्षी, Moto G Stylus 2021 स्मार्टफोन ४ GB RAM + १२८ GB स्टोरेजसह $२९९ (अंदाजे रु. २२,३००) मध्ये सादर करण्यात आला होता.