मोटोरोला ही एक मोबाइल उत्पादक कंपनी आहे, ती आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत असते. तर भारतातील सर्वोत्कृष्ट ५ जी स्मार्टफोन ब्रँडने काल मोटोरोला जी३४ ५जी (moto g34 5G) स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा सर्वात वेगवान आणि स्वस्त ५जी फोन ठरणार आहे. तर Moto g34 या स्मार्टफोनची किंमत, ऑफर्स, कॅमेरा, बॅटरी, स्टोरेज या फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्मार्टफोनमध्ये ५० एमपी कॅमेरा सिस्टीम आहे. स्मार्टफोन 4GB किंवा 8GB LPDDR4X रॅमसह स्टोरेज प्रदान करते; ज्याला RAM बूस्ट फीचर्ससह १६जीबी (16GB) पर्यंत वाढवता येते आणि 1TBSD कार्डसह मोठ्या प्रमाणात 128GB UFS 2.2 स्टोरेज वाढवता येऊ शकते. मोटो जी३४ ५जी 13 5G बँड, VoNR आणि carrier aggregation आदी गोष्टींमुळे हा कंपनीचा ५जी परफॉर्मर ठरेल.

सुरक्षा आणि आरोग्य कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. यामध्ये अँटी-फिशिंग, ऑटो लॉक आणि Moto Secure 3.0 असे अतिरिक्त फीचर्सदेखील उपल्बध आहेत. यात लहान मुलांसाठी स्पेस, मोटो कनेक्ट, मोबाइल गेम्स आणि रेडी फॉर पीसी (pc) [हे फक्त ८ जीबी व्हेरिएंटमध्ये उपल्बध ], तुमच्या फोनमधील ॲप किंवा संगणकावरील एखादी फाईल उघडण्यास मोटो अनप्लग केले आहे. मोटो जी३४ ५जी मध्ये व्हेगन लेदर फिनिश तसेच 3D ऍक्रेलिक ग्लास (PMMA) फिनिशसह प्रीमियम डिझाइनसह एक जबरदस्त लुकदेखील आहे.

हेही वाचा…WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपचा युजर्सना धक्का! आता ‘ही’ सुविधा मिळणार नाही मोफत…

मोटो जी३४ ५जी वापरकर्त्यांना 120 Hz रिफ्रेश रेट, ६.५ डिस्प्लेवर, Expansive स्क्रीन आणि डिस्प्ले, चित्रपट, गेम, व्हिडीओ चॅट करण्याचा आनंद द्विगुणित करते. याव्यतिरिक्त, स्क्रीनवरील लाईट वापरकर्त्यांच्या सोयीनुसार आपोआप कमी-जास्तसुद्धा करून देते. मोटो जी३४ ५जी मध्ये ५००० एमएएच बॅटरी अनेक दिवस ऊर्जा पुरवते. स्मार्टफोनमधील टर्बोपॉवर™ 20W चार्जरसह त्वरीत चार्ज होतो; यामुळे युजर्सना सतत फोन चार्ज करण्याची गरज नाही. कारण पूर्ण दिवस फोन चार्ज राहू शकतो. तसेच डॉल्बी ॲटमॉससह (Dolby Atmos) दोन मोठे स्टिरीओ स्पीकर्स स्टुडिओ-गुणवत्तेचा ऑडिओ प्रदान करतो.

मोटो जी३४ ५जी (moto g34 5G) तीन सुंदर ओशन ग्रीन, आइस ब्लू आणि चारकोल ब्लॅक आदी रंगांमध्ये उपलब्ध असेल. तसेच यातील काही मर्यादित आवृत्तीचे स्मार्टफोन्स व्हेगन लेदर डिझाइन, ओशन ग्रीन रंग आणि आइस ब्लू आणि चारकोल ब्लॅकमध्ये 3D ॲक्रेलिक ग्लास (PMMA) फिनिशसह उपल्बध असतील. तसेच मोटो जी३४ ५जीमध्ये ४जीबी रॅम आणि ८जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजसह दोन मेमरी प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

१७ जानेवारी २०२४ ला दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्ट, मोटोरोला डॉट इन आणि काही निवडक स्टोअर्सवर या स्मार्टफोन्सची विक्री सुरू होईल.

स्मार्टफोनची लॉन्च किंमत:

4GB रॅम + 128GB स्टोरेज : १०,९९९ रुपये.
8GB रॅम + 128GB स्टोरेज : ११,९९९ रुपये.

ऑफर :

एक्स्चेंज ऑफरवर १,००० रुपयांची सूट असणार आहे. तर या ऑफरसह स्मार्टफोनचा प्रभावी दर : 4GB + 128GB: ९,९९९ रुपये आणि 8GB + 128GB: १०,९९९ रुपये एवढा असेल.

ऑपरेटर ऑफर :

रिलायन्स जीओकडून ४,५०० ऑफर देण्यात आली आहे. रिलायन्सचा प्री-पेड प्लॅन ३९९ रुपयांच्या प्लॅनवर ४,५०० रुपयांची सूट असणार, तर २००० रुपयांचा कॅशबॅक आणि २५०० रुपयांचे पार्टनर कूपनचा समावेश असणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorola launches moto g34 5g with snapdragon 695 soc launched in india with low price asp
Show comments