भारतीय बाजारपेठेत आपले स्थान टिकवण्यासाठी कंपन्यांची नजर प्रीमियम आणि बजेट अशा दोन्ही प्रकारच्या मार्केटवर असते. मोटोरोला हे यातीलच एक उदाहरण आहे. मोटोरोला ही एक मोबाइल उत्पादक कंपनी आहे. परवडणारे स्मार्टफोन लाँच करण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. तर हा ट्रेंड कायम ठेवत कंपनीने नवीन मोटो जी २४ (Moto G24) भारतात लाँच केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोटो जी२४ पॉवर ७ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट, ब्रँडची अधिकृत वेबसाइट आणि स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपल्बध असणार आहे. मोटो जी २४ ग्लेशियर ब्लू आणि इंक ब्लू या दोन रंग पर्यायांमध्ये, दोन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये स्टोरेजसाठी दोन पर्याय असणार आहेत; पहिला ४ जीबी प्लस १२८ जीबी आणि दुसरा ८जीबी प्लस १२८ जीबी आणि या पर्यायांची किंमत ८,९९९ रुपये अशी असणार आहे. या व्यक्तिरिक्त कंपनी एक्स्चेंजवर ७५० रुपयांची सूटसुद्धा देणार आहे.

हेही वाचा…अखेर प्रतीक्षा संपली! Vi चे 5G नेटवर्क होणार लॅान्च; एअरटेल अन् जिओबरोबर करणार स्पर्धा

नवीन मोटो जी२४ 90Hz रिफ्रेश रेट, एचडी प्लस रिझोल्यूशन आणि ५०० नीट्सपर्यंत पीक ब्राइटनेससह ६.५६ इंचाच्या आयपीएस एलसीडी पॅनेलसह येतो. स्मार्टफोन ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह जोडलेल्या मीडिया टेक हेलिओ G85 SoC द्वारे समर्थित आहे. हे 30W टर्बो फास्ट चार्जिंगसाठी 6,000mAh बॅटरी पॉवर देतो.

कॅमेरा :

तसेच मोटो जी २४ च्या बॅकला ड्युअल कॅमेरा, ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो शूटरसह येतो. तसेच फ्रंटला १६ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. नवीन मोटो जी २४ मध्ये डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह स्पीकर, मोबाइलमध्ये साइड फिंगरप्रिंट स्कॅनर, ८ जीबीपर्यंत रॅम, ३.५ एमएम हेडफोन जॅक, ब्ल्यूटूथ ५.० आणि आयपी ५२ पाणी आणि धूळीपासून मोबाइलचे संरक्षण करतो. तर स्वस्तात मस्त अनेक फीचर्सचा समावेश असणारा हा फोन ग्राहकांना ७ फेब्रुवारीपासून खरेदी करता येणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorola launches new budget friendly moto g24 affordable smartphone with dual camera setup asp
Show comments