आसिफ बागवान

मोटोरोला कंपनीने दोन महिन्यांपूर्वीच ‘फ्लिप फोन’ भारतात आणला. ६० हजार रुपयांपासून सुरू होणाऱ्या या स्मार्टफोनची चर्चा शमते न शमते तोच मोटोरोलाने अवघ्या ९९९९ रुपयांचा मोटो जी १४ हा मोबाइल आणून  दोन्ही किंमतश्रेणीतील बाजारात हवा निर्माण केली आहे.

share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
sensex drops 663 point nifty ends below 24200
‘मुद्रा’ कर्जांची मर्यादा दुपटीने वाढून २० लाखांवर
Anti farmer ideology of Modi government
लेख : शेतकरीहिताची ‘चित्रफीत’; राष्ट्रहित की मित्रहित?
Hyundai shares disappoint investors
ह्युंदाईच्या समभागाकडून गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा; पदार्पणालाच ७ टक्के घसरणीने तोटा
fraud with businessman in Buldhana by investing in stock market
सावधान! ‘शेअर मार्केट’मध्ये पैसे गुंतवण्याचा बेत? आधी ही बातमी वाचा
implementation of hawkers policy stalled for ten years
विश्लेषण : मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी दहा वर्षे का रखडली? मुजोर फेरीवाल्यांना ‘राजकीय आशिर्वाद’?
MSP on agricultural produce
विश्लेषण : शेतमालाचे जाहीर हमीभाव शेतकऱ्याला प्रत्यक्षात मिळतात का?

भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत उच्च दर्जाच्या, प्रीमियम श्रेणीतील स्मार्टफोनच्या मागणीत गेल्या आर्थिक तिमाहीत दुप्पट वाढ झाल्याचे नुकतेच एका अहवालातून समोर आले. देशातील मोबाइल ग्राहक आता अधिक किमतीच्या, अधिक दर्जेदार वैशिष्टय़े असलेल्या स्मार्टफोनकडे वळत आहेत. याचे आणखी एक निदर्शक म्हणजे गेल्या आठ वर्षांत भारतातील स्मार्टफोनच्या सरासरी किमतीत झालेली वाढ. २०१५ या वर्षांत भारतात विक्री होणाऱ्या स्मार्टफोनची किंमत १२ ते १५ हजार इतकी होती. ही सरासरी २०२२ मध्ये १८५०० रुपयांवर पोहोचल्याचे आणखी एका अहवालातून समोर आले आहे. एकीकडे प्रीमियम दर्जाच्या ग्राहकांची संख्या वाढत असली तरी, स्वस्त दरातील मोबाइलचा ग्राहकवर्गदेखील वाढता आहे. भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्येच्या देशात हा कल चकित करणारा नाही. त्यामुळेच भारतीय बाजारपेठेत जम बसवू पाहणाऱ्या कंपन्यांची नजर प्रीमियम आणि बजेट अशा दोन्ही प्रकारच्या बाजारावर असते. मोटोरोला हे यातीलच एक उदाहरण.

हेही वाचा >>> ४८ मेगापिक्सल कॅमेरा आणि पाच रंगांसह iPhone 15 आणि iPhone 15 प्लस भारतात लॉन्च; किती असणार किंमत?

मोटोरोला कंपनीने दोन महिन्यांपूर्वीच ‘रेझर’ श्रेणीतील ‘फोर्टी अल्ट्रा’ हा ‘फ्लिप फोन’ भारतात आणला. सुमारे ६० हजार रुपयांपासून सुरू होणाऱ्या या स्मार्टफोनची चर्चा शमते न शमते तोच मोटोरोलाने अवघ्या ९ हजार ९९९ रुपयांचा मोटो जी १४ हा मोबाइल आणून भारतातील दोन्ही किंमतश्रेणीतील बाजारात हवा निर्माण केली आहे.

‘मोटो जी १४’ हा स्वस्त दरातला मात्र, प्रीमियम वैशिष्टय़ांच्या तोडीचा स्मार्टफोन आहे, असे त्याचे वर्णन करता येईल. मोबाइलची किंमत आटोक्यात ठेवण्यासाठी कंपन्यांना त्याचे दृश्य स्वरूप किंवा अंतर्गत वैशिष्टय़े यांमध्ये तडजोड करावी लागते. मात्र, मोटो जी १४ मध्ये अशी तडजोड दिसत नाही. या मोबाइलचे उत्तम फिनिशिंग हे त्याचे कारण आहे.  मोटो जी १४ ची बॉडी प्लास्टिकने बनलेली असली तरी, त्या प्लास्टिक आवरणाला ग्लाससारखी चमक दण्यात आली आहे, त्यामुळे हातात घेईपर्यंत या मोबाइलला प्लास्टिक बाह्यावरण असल्याचे लक्षात येत नाही. गेल्या महिन्यात मोटो जी १४ लाँच झाल्यानंतर काही दिवसांतच मोटोरोलाने ‘जी १४’ला लेदरसारखे बाह्यावरणही उपलध करून दिले आहे. विशेष म्हणजे मोबाइलच्या किमतीत कोणताही बदल नाही.

डिस्प्ले आणि रचना

मोटो जी १४ मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एलईडी डिस्प्ले असला तरी त्याचा ब्राइटनेस उत्तम आहे. डिस्प्लेला काळी चौकट बसवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील बाजूकडे पाहताना हा फोन जाडसर भासतो. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी फ्रंट कमेऱ्यासाठी एक छोटेसे छिद्र देण्यात आले आहे. स्मार्टफोनच्या वरच्या बाजूस ऑडिओसाठी ३.५ एमएमचा जक देण्यात आला असून उजवीकडे व्हॉल्यूम आणि लाक बटणे पुरवण्यात आली आहेत. खालच्या बाजूस चार्जिग पाइंट आणि मायक्रोफोनची सुविधा देण्यात आली आहे. 

हेही वाचा >>> iPhone 15: ‘अ‍ॅपल’ चार्जिगचा भेदाभेद संपुष्टात; नव्या आयफोन १५ सह सर्व उत्पादनांसाठी ‘सी-टाइप’ चार्जर

कार्यक्षमता आणि बॅटरी

मोटो जी १४मध्ये चार जीबी रॅम आणि १२८ जीबी अंतर्गत स्टोअरेजची सोय करण्यात आली आहे. दहा हजार रुपयांच्या किमतीत मिळणारी ही सुविधा खरोखरच लक्षणीय आहे. मोबाइलमध्ये दोन सिम आणि मेमरी कार्डसाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाइलची स्टोअरेज क्षमता एक टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. मोबाइलमध्ये ऑक्टाकोअर प्रोसेसर असून तो ताकदीने काम करतो. या मोबाइलवर गेम खेळतानाही तो अजिबात संथ होताना किंवा त्याचा दर्जा ढासळताना दिसत नाही. या फोनमध्ये पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली आहे. सध्या सर्वच बजेट मोबाइलमध्ये इतक्या मोठय़ा बॅटऱ्या देण्यात येत असल्याने त्यात फार काही नावीन्य नाही. मात्र, कंपनीने मोबाइलसोबत २० वॉट क्षमतेचा चार्जरही दिला आहे. गेल्या काही वर्षांत मोबाइल कंपन्यांनी मोबाइलच्या बॉक्समध्ये केवळ चार्जिग केबलच देण्याचा कल रूढ केला आहे. मात्र, मोटोरोलाने केबलसोबत अ‍ॅडाप्टरही दिला असून तो जलद चार्जिगसाठी उपयुक्त आहे.

अन्य वैशिष्टय़े

* अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टीम

* तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट आणि अँड्रॉइड १४चे अपडेट

* दुहेरी स्पीकर

* फोर जी, थ्री जी आणि टू जी नेटवर्क तंत्रज्ञान

* सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सेल

* कॅमेऱ्यामध्ये लाइव्ह फिल्टर, पोट्र्रेट, नाइट व्हिजन मोड

* फिंगरप्रिंट स्कॅनर सुरक्षा

* किंमत : ९ हजार ९९९ रुपये

कॅमेरा मोटो जी १४चा बॅक कॅमेरा हे त्याचे प्रमुख वैशिष्टय़ ठरू शकेल. फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेल आणि दोन मेगापिक्सेलचे कॅमेरे पुरवण्यात आले आहेत. हे दोन्ही कॅमेरे एकमेकांना पूरक राहून उत्तम दर्जाच्या छायाचित्रणाचा अनुभव देतात. पुरेशा प्रकाशात छायाचित्रे अतिशय स्पष्ट येतात. अर्थात अंधूक जागेत केलेल्या छायाचित्रणाला तितका दर्जेदार अनुभव येत नाही. मात्र, दहा हजार रुपयांच्या किमतीच्या स्मार्टफोनमध्ये असलेला हा सर्वात उत्तम कॅमेरा फोन आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.