Motorola ने एकाच वेळी आपले दोन नवीन फोन लॉन्च केले आहेत. ज्यात Moto G 5G (2023) आणि Moto G Stylus (2023) यांचा समावेश आहे. Moto G 5G या फोनमध्ये २० Hz इतका रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तर Moto G Stylus (2023) मध्ये ९० Hz इतका रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या दोन्ही फोनची किंमत फीचर्स, स्पेसिफिकेशन याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Moto G 5G (2023) चे फीचर्स

Moto G 5G (2023) या स्मार्टफोनमध्ये अँन्ड्रॉईड १३ वर आधारित My UX सह येतो. याशिवाय यामध्ये ६.५ इंचाचा HD + डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेट १२० Hz इतका आहे. तसेच फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. तसेच ड्युअल कॅमेरा सेटअप या मोटोरोलाच्या फोनमध्ये वापरकर्त्यांना मिळणार आहे. ज्यामध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स आणि २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळेल. सेल्फी व व्हिडीओसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

हेही वाचा : AI मुळे वाढतोय धोका? व्हाईट हाऊसमध्ये दिग्गज टेक कंपन्यांच्या सीईओंची होणार बैठक, जो बायडेन म्हणाले…

Moto G 5G (2023) या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth 5.1, GPS, A-GPS, GLONASS, Galileo, Beidu, 3.5mm हेडफोन जॅक, टाइप सी पोर्ट सारखे फीचर देण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला ५००० mAh ची बॅटरी आणि त्याला १५W चे चार्जिंग मिळते.

Moto G Stylus (2023) चे फीचर्स

Moto G Stylus (2023) मध्ये अँन्ड्रॉईड १३ वर आधारित My UX देण्यात आले आहे. या फोनमध्ये तुम्हाला ६.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये ४जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर मिळणार आहे. Moto G Stylus (2023) या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स मिळते. दुसरी लेन्स ही २ मेगापिक्सलची लेन्स मिळणार आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth 5.1, GPS, A-GPS, GLONASS, Galileo, Beidu, 3.5mm हेडफोन जॅक, टाइप सी पोर्ट सारखे फीचर देण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला ५००० mAh ची बॅटरी आणि त्याला १५W चे चार्जिंग मिळते.

हेही वाचा : Zoom App ला पूर्ण भारतामध्ये मिळाले टेलिकॉम लायसन्स; ‘या’ कंपन्यांशी होणार स्पर्धा

काय आहे दोन्ही स्मार्टफोनची किंमत ?

Moto G 5G (2023) च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज सणाऱ्या व्हेरिएंटची किंमत $२४९.९९ (सुमारे २०,५०० रुपये ) इतकी आहे. हा फोन २५ मे पासून Ink आणि Harbor Mist या रंगांमध्ये खरेदी करू शकता. Moto G Stylus (2023) च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत $१९९.९९ (सुमारे १६,२०० रुपये ) इतकी आहे. या फोनची विक्री अमेरिकेमध्ये ५ मे पासून सुरु होणार आहे. वापरकर्ते हा फोन Glam Pink आणि Midnight Blue या दोन रंगांमध्ये खरेदी करू शकतात. मात्र हे दोन्ही स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च होणार याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motortola launch moto 5g and moto g stylus 2023 launched with 48 mp camera and 6 5 hd plus display check details tmb 01