रिलायन्स जिओ ही देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओने सर्वांत पहिल्यांदा भारतात आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे.अमर्यादित कॉलिंग, ५जीडेटा (5G) , ओटीटी (OTT) मेंबरशिप आणि स्वस्त फोन ऑफर करून भारतातील दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणल्याबद्दल मुकेश अंबानी यांचे अनेकदा कौतुक केले जाते.
मुकेश अंबानींच्या मालकीची रिलायन्स जिओ कंपनी प्रत्येक नवीन वर्षाला त्यांच्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि आकर्षक रिचार्ज प्लॅन लाँच करण्यासाठी ओळखली जाते. आता कंपनीने नेहमीप्रमाणे नवीन वर्ष २०२४ साठी रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे; ज्यात अनेक ऑफर आहेत. मुकेश अंबानींने ऑफर केलेला २०२४ म्हणजेच नवीन वर्षाचा हा प्लॅन खरे तर जुना आहे. पण, नवीन वर्षाच्या निमित्ताने कंपनी प्लॅनसह २४ दिवसांची अतिरिक्त वैधता (व्हॅलिडिटी) ऑफर करीत आहे. इतर प्लॅन्सप्रमाणेच रिलायन्स जिओ न्यू इयर २०२४ प्लॅनमध्ये दररोज 5G २.५ जीबी डेटा (2.5GB) आणि ओटीटी (OTT) सबस्क्रिप्शनसह अमर्यादित कॉल्स ऑफर करते आहे. तसेच रिलायन्स जिओ नवीन वर्ष २०२४ चा हा प्लॅन फक्त प्रीपेड वापरकर्त्यांसाठी असणार आहे.
हेही वाचा…Vodafone-Idea ने लाँच केला ‘हा’ हटके प्लॅन! दररोज २ जीबी डेटा, Amazon Prime फ्री अन्…
नवीन रिलायन्स जिओ २०२४ च्या प्लॅनची किंमत २,९९९ रुपये आहे. दररोज २.५ जीबी ५जी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस प्रदान करणारा हा प्लॅन ३८९ दिवसांचा आहे. तसेच हा प्लॅन तुम्हाला ३८९ दिवसांव्यतिरिक्त २४ दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी ऑफर करतो. तसेच या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा व जिओ क्लाऊडचे सदस्यत्वदेखील मिळते. याआधीसुद्धा कंपनीने दिवाळीत या ऑफरसारखा एक प्लॅन जाहीर केला होता.
अलीकडेच मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने जिओ टीव्ही प्रीमियम सबस्क्रिप्शनसह नवीन तीन योजनादेखील लाँच केल्या आहेत. रिलायन्स जिओची योजना अमर्यादित कॉल्स, ५जी (5G) डेटा ऑफर करते आणि ते झी ५ (Zee5), डिस्नी प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar), जिओ सिनेमा (JioCinema)सारख्या १४ ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सदस्यत्वांसह येते. नवीन जिओ प्रीपेड प्लॅनची ३९८ रुपयांपासून सुरुवात होते. तसेच रिलायन्स जिओचे जिओ टीव्ही प्रीमियम प्लॅन ३९८ रुपये, १,१९८ रुपये व ४,४९८ रुपये अशा तीन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.रिलायन्स जिओचा ३९८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन २८ दिवसांसाठी वैध आहे आणि तो वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल व दररोज १०० एसएमएस ऑफर करतो. हा प्लॅन जिओ टीव्ही ॲप्लिकेशनद्वारे १२ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शनदेखील देतो.