WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. याची मूळ कंपनी ही Meta आहे. यावरून वापरकर्त्यांना एकमेकांशी संवाद साधू शकतात. आपले फोटो, व्हिडीओ स्टेटसला ठेवू शकतात. whatsapp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असते. मेटा कंपनीने २०२३ मध्ये व्हॉट्सअॅपवर काही नवीन फीचर्स आणली आहेत. त्यामध्ये सर्वोत्तम फीचर्स कोणती आहेत. आज आपण व्हॉट्सअॅपच्या स्टेबल व्हर्जनवर उपलब्ध असलेल्या फीचर्सबद्दल माहिती घेणारआहोत. आज आपण २०२३ मधील सर्वोत्तम अशा फीचर्सबद्दल जाणून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मल्टीपल डिव्हाईस
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर WhatsApp ने एकच अकाउंट अनेक डिव्हाईसवर वापरण्याचे फिचर लॉन्च केले आहे. ज्या प्रमाणे व्हॉट्सअॅप वेबचा वापर करता तसेच हे फिचर देखील काम करते. जर का तुम्हाला वेगळ्या फोनवर तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट चालवायचे आहे. तर नवीन डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप डाउनलोड करा आणि तुमचा फोन नंबर टाका. त्यानंतर वरच्या बाजूला उजवीकडे तीन डॉट्स असतील तिथे क्लिक करून सध्याचे अकाउंट लिंक करावे. हे सर्व झाल्यानंतर तुमच्या नेहमीच्या फोनवरून QR कोड स्कॅन करा. तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट दोन स्मार्टफोनवर चालवू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी ४ वेगवेगळ्या स्मार्टफोनवर वापरू शकता. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.
Chat lock फीचर
WhatsApp वर आता तुम्ही तुमचे पर्सनल चॅट्स दुसऱ्यांपासून लपवून ठेवू शकणार आहात. यासाठी कंपनीने ‘Chat Lock’ फिचर रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. अजून जर का तुम्हाला याचे अपडेट मिळाले नसेल तर येत्या काही दिवसांमध्ये या फीचरचे अपडेट तुम्हाला मिळतील. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला जे चॅट लॉक करायचे आहे त्या चॅट विंडोमध्ये जावे लागेल. त्या युजरच्या प्रोफाईलवर जाताच तुम्हाला चॅट लॉकचा पर्याय दिसेल. हे सुरु करताच तुमच्या फोनसाठी जी सिक्युरिटी सेटिंग व असेल तीच या चॅटवर देखील लागू होईल.
Edit Messages फीचर
आपल्या यूजर्ससाठी मेटा कंपनी व्हॉट्सअॅपमध्ये नवनवीन अपडेट्स करत असते. असेच एक नवीन फीचर व्हॉट्सअॅपने लॉन्च केले आहे. या फीचरमुळे यूजर्सना समोरच्या व्यक्तीला पाठवलेला मेसेज चॅटमधून १५ मिनिटांचा अवधी मिळणार आहे. याबाबतची माहिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. नुकतंच या नव्या फीचरच्या लॉन्चची मेटा कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे. यूजर्सना आता चॅटवर आधीपेक्षा जास्त नियंत्रण ठेवता येईल. या फीचरमुळे मेसेजमधील शब्दांमध्ये दुरुस्ती करणे किंवा त्याला अधिकचा संदर्भ जोडणे शक्य होणार आहे. एडिट फीचरसाठी आम्ही फार उत्सुक आहोत. मेसेज पाठवल्यानंतर १५ मिनिटांच्या आत यूजर्सना मेसेजमध्ये बदल करता येणार आहे. मेसेज टॅप करुन पुढे ‘एडिट’ पर्याय निवडल्यावर मेसेजमधील चुका सुधारता येणार आहेत.
‘HD फोटो ‘ फिचर
प्रत्येकालाच आपले चांगले चांगले फोटो काढण्याची आवड असते. आपण ते फोटो काढल्यानंतर कोणाला सेंड करायचे असल्यास WhatsApp वरून देखील करत असतो. मात्र त्यावरून फोटो पाठवताना त्याची क्वालिटी किंवा साईझ कंप्रेस होते. Whatsapp ने आता असे होऊ नये व फोटो पाठवताना वापरकर्त्यांना एक चांगला अनुभव मिळावा म्हणून एक नवीन फिचर आणले आहे. हे फिचर iOS आणि अँड्रॉइड या दोन्ही वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आले आहे. याआधी फोटो पाठवताना त्याची साईझ किंवा क्वालिटी कंप्रेस होत असे. मात्र या फीचरच्या मदतीने तुम्ही पाठवलेले फोटो HD क्वालिटीमध्येच समोरच्याला दिसणार आहे.WABetainfo या वेबसाईटने HD Photos फीचरच्या रोल आउटची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, हे फिचर बीटा वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे.
व्हिडीओ रेकॉर्डिंग मोड
हे फिचर लॉन्च होण्यापूर्वी whatsapp वर थेट व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरकर्त्यांना शटर बटण प्रेस करून ठेवावे लागत होते. मात्र आता यासाठी एक वेगळे बटण देण्यात आले असून याद्वारे तुम्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकणार आहात.
Voice Status फीचर
मेटाच्या मालकीचे व्हाट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी काही नवीन फीचर्स आणली आहेत. यावेळी व्हाट्सअॅपने स्टेटस संबंधित फिचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून वापरकर्त्यांना स्वतःला व्यक्त करणे आणि इतरांशी कनेक्ट होणे सोपे जाते. व्हाट्सअॅप स्टेटस हे २४ तासांनी डिलीट होते. या फीचरमधून लोक त्यांचे फोटो , व्हिडीओ इत्यादी शेअर करू शकणार आहेत. व्हाट्सअॅपमध्ये याशिवाय आता ३० सेकंदापर्यंतचे व्हॉइस मेसेज रेकॉर्ड व्हाट्सअॅपवर शेअर करता येणार आहेत. व्हाट्सअॅपच्या म्हणण्यानुसार वापरकर्ते वैयक्तिक अपडेट देण्यासाठी व्हॉइस स्टेटसचा वापर करू शकणार आहेत. व्हाट्सअॅपचे वापरकर्ते त्यांच्या स्टेटसवर लोकांच्या रिप्लायची अपेक्षा करतात. तुम्हाला कोणाचा स्टेटस्वर रिप्लाय द्यायचा असेल तर ते आता सोपे होणार आहे. आता वर स्वाईप केले केले की ८ ईमोजी दिसणार आहेत. त्यापैकी कोणत्याही एका इमोजीवर टॅप करून तुम्ही रिप्लाय देऊ शकणार आहात.