भारतात १३ ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. यावर्षी मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील अनेक चित्रपटगृहांनी १३ ऑक्टोबर रोजी भारतात ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिवसाचे औचित्य साधून तिकिट शुल्कात मोठी सवलत देण्याचा निर्णय ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने घेतला आहे. १३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांना चित्रपटाच्या एका तिकिटासाठी फक्त ९९रुपये आकारण्याचा निर्णय मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया घेतला आहे.
या दिवशी प्रेक्षक केवळ ९९ रुपयांमध्ये आपल्या आवडत्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत. प्रेक्षक चित्रपटांचे तिकीट ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने बूक करू शकतात. इच्छुक प्रेक्षक बुक माय शो, पेटीएम सारखे प्लॅटफॉर्म किंवा मल्टिप्लेक्सच्या संबंधित वेबसाइटवरून देखील तिकीट बूक करू शकतात. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
हेही वाचा : क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! एअरटेलने लॉन्च केले ‘हे’ चार प्लॅन्स, जाणून घ्या
तिकीट बूक करण्यासाठी तुम्हाला कोणते चित्रपट पाहायचा आहे ते निवडायचे आहे. तसेच तिथे शुक्रवार देखील निवडावा. काही आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी शुक्रवारी तिकीटांचे बुकिंग उपलब्ध नाही आहे. तथापि, जवान, मिशन रानीगंज आणि थँक यु फॉर कमिंग सारखे काही लोकप्रिय भारतीय चित्रपट आहेत जे अजूनही कमी किंमतीत उपलब्ध आहे. ही तिकिटे बूक करताना मल्टिप्लेक्सचे टॅक्स आणि चार्जेस वेगवेगळे असू शकतात.
राष्ट्रीय चित्रपट दिन ४ हजार पेक्षा जास्त स्क्रीन्सवर साजरा केला जाणार आहे. यामध्ये पीव्हीआर आयनॉक्स, CINEPOLIS, सिटीप्राइड, एशियन मुक्ता A2, मुव्ही टाइम WAVE, M2K, DELITE अन अन्य चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.