मुंबई, पुणे आणि अन्य मोठ्या शहरांत नोकरीसाठी अनेक ठिकाणांवरून नागरिक येत असतात. त्यामध्ये शहरामध्ये ते एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहन किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. जर का तुम्ही सार्वजनिक दळणवळण व्यवस्थेमध्ये बसने प्रवास करत असाल किंवा बसने ऑफिसला येत- जात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्वाची असू शकते. तर नक्की ही काय बातमी आहे हे आपण जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर का तुम्ही बसने प्रवास करत असाल आणि बसमध्ये प्रवास करताना जर का तुम्ही फोनवर बोलत असाल तर तुमची ही सवय तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकते. आता प्रवासामध्ये मोठ्याने बोलणाऱ्यांना बसमध्ये जागा दिली जणार नाही. मुंबईमधील प्रमुख दळणवळणाचे साधन असलेल्या BEST बसमध्ये जागा दिली जाणार नाही आहे. ज्यांच्याकडे हेडफोन्स असतील (No entry Without Headphones) किंवा बसमध्ये जे शांतपणे बसतील अशा प्रवाशांनाच प्रवेश मिळणार आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

हेही वाचा : Reliance Jio, Vi आणि Airtel चे प्रीपेड कनेक्शन पोस्टपेडमध्ये कसे ट्रान्सफर करायचे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने एक नियम जारी केला आहे. लोकांकडून अनेक तक्रारी आल्यामुळे असे पाऊल उचलण्यात आल्याचे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. आजच्या वास्तविक जीवनामध्ये लोकं सोशल मिडियावर रील्स तयार करण्यासाठी बस आणि मेट्रोमध्ये खूप आवाज करतात. तसेच अनेकजण फोनआळीवर खूप जोरात बोलतात. यामुळे आता नवीन नियमांनुसार इअरफोन किंवा हेडफोन जवळ ठेवावे लागणार आहेत.

मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत केली जाणार कारवाई

लोकांना बसमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये व शांततेत प्रवास करता यावा म्हणून बेस्टने नियम तयार केला आहे. या नियमांचे जो कोणी उल्लंघन करेल त्यांच्यावर मुबई पोलिस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. नव्या नियमानुसार प्रवाशांना स्पीकरद्वारे देखील गाणी एकण्यास बंदी घालण्यात आली आहे. बेस्ट आपली सेवा मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या प्रत्येक शहरांमध्ये आपली सेवा पुरवते. बेस्टमधून दररोज ३० लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai best bus new rule no phone calls allowed without earphones passengers fine go to jail check details tmb 01