मुंबईत २४ डिसेंबर रोजी सर्वात मोठे इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रदर्शनाचे विजय सेल्सद्वारे आयोजन करण्यात आले आहे. विजय सेल्स या भारतातील रिटेल कंपनीने इंडिया इंटरनॅशनल कंझ्युमर फेअरसह सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शनाची घोषणा केली आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स येथील एमएमआरडीए ग्राऊंड्सवर आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात ६५ हून अधिक इलेक्‍ट्रॉनिक ब्रँडची उत्पादने स्वस्त दरात विक्रीसाठी सादर केली जाणार आहेत. यामध्‍ये सॅमसंग, एलजी, सोनी, ॲपल, वनप्‍लस, बोट, हायर, व्‍हर्लपूल, असुस, हिताची, गोदरेज, आयएफबी, मॉर्फी रिचर्ड्स, फिलिप्‍स, वंडरशेफ, एआय स्मिथ आदी ६५ हून अधिक लोकप्रिय ब्रँडचा समावेश आहे.

मुंबईतील सर्वात मोठे इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रदर्शन ५०,००० चौरस मीटर जागेवर स्थापन करण्यात आले आहे; जे १६ दिवसांसाठी असेल. म्हणजेच प्रदर्शन ८ जानेवारी २०२४ पर्यंत ग्राहकांसाठी खुले राहील. ग्राहकांना विविध ऑफरचा अनुभव देणे, त्यांच्याशी कनेक्‍ट होणे आदी गोष्टी लक्षात ठेवून हे प्रदर्शन डिझाइन केले आहे, असे विजय सेल्‍सचे संचालक निलेश गुप्‍ता यांनी सांगितले आहे. तसेच या प्रदर्शनात सर्व ब्रॅण्‍ड्सचे स्‍वत:चे विभाग असणार आहेत, जे ग्राहकांना नवीन गॅझेट्स खरेदी करण्‍यापूर्वी त्यांचा अनुभव घेण्‍याचीही संधी देतील. ग्राहकांसाठी खास गोष्ट अशी की, गॅझेट्स किंवा उत्पादन जवळून पाहण्याचा, नवीन ब्रॅण्डसनी लाँच केलेल्या नवीन उत्पादनाचा चांगला अनुभव ठरेल.

gold jewelry scam with housewife in kurla
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
kangana ranaut makeup indira gandhi prosthetic make up
कंगना रणौत ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी; असं झालं ट्रान्सफॉर्मेशन, प्रोस्थेटिक मेकअपची कमाल; व्हायरल झाला व्हिडीओ
Ajanta Verul Film International Film
ठरलं! ‘या’ तारखांना होणार अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, ‘कालिया मर्दन’ मूकपटाचं खास सादरीकरण
My Portfolio, Indiamart Intermesh Limited, buying and selling goods,
माझा पोर्टफोलिओ: वस्तू खरेदी-विक्रीचा लाभदायी विश्वासू मंच, इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड (बीएसई कोड ५४२७२६)
loksatta lokankika three winners
‘लोकसत्ता लोकांकिका’ विजेत्या एकांकिका पुन्हा पाहण्याची संधी, उरणमधील ‘जेएनपीटी’च्या सभागृहात ४ जानेवारीला ‘नाट्योत्सव’
Bollywood actors welcomed new year by enjoying tourism in their favorite foreign destinations
बॉलिवूड कलाकारांनी परदेशात केले नववर्षाचे स्वागत
Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos

हेही वाचा…नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जिओने ग्राहकांसाठी लाँच केला ‘हा’ हटके प्लॅन; जाणून घ्या…

प्रदर्शनादरम्यान ग्राहकांना मिळणार सूट :

ग्राहकांना खरेदीवर त्वरित बँक सूट, कॅशबॅकसुद्धा मिळू शकणार आहेत. दरम्‍यान, ग्राहकांना पेटीएम पीओएस मशीनच्‍या माध्‍यमातून केलेल्‍या सर्व कार्ड व्‍यवहारांवर जवळपास ७०० रुपये किमतीचे मूव्‍ही व्हाऊचर्स मिळू शकतात. एचडीबी पेपर फायनान्‍सच्‍या माध्‍यमातून केलेल्‍या खरेदींसाठी ग्राहकांना १० टक्‍क्‍यांची म्‍हणजेच १०,००० रुपयांची कॅशबॅक मिळू शकते.तसेच १५,००० रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यावर एचडीएफसी बँक क्रेडिट व डेबिट कार्ड्स ईएमआय व्यवहारांवर १० टक्क्यांची म्हणजेच जवळपास ३००० पर्यंतची सूट मिळू शकणार आहे. तसेच २०,००० रुपयांपेक्षा अधिक खरेदी केल्यावर आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट व क्रेडिट कार्ड आणि इएमआयने पेमेंट केल्यास ७.५ टक्क्यांची सूट मिळेल.तर तुम्हाला ५००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. एचएसबीसी बँक ग्राहकांनी २०,००० रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यावर त्यांंना क्रेडिट कार्ड, इएमआयचा उपयोग करून ७.५ टक्के सूट मिळेल. आरबीएल बँक ग्राहकांनी २०,००० रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यावर क्रेडिट कार्ड, इएमआयवर १० टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास ३,५०० रुपयांची त्‍वरित सूट मिळेल; तर १५,००० रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यास क्रेडिट कार्ड, नॉन-इएमआयसह ५ टक्‍क्‍यांची म्‍हणजेच जवळपास २,००० रुपयांची त्‍वरित सूट मिळेल.

Story img Loader