How Do I Use MyJio App : रिलायन्स जिओ कंपनी त्यांच्या ग्राहकांना खूश करण्याचा एकही मार्ग सोडत नाही. अगदी वायफाय, रिचार्जसाठी वेगवेगळे स्वस्त आणि अधिक फायदे देणारे प्लॅन्स लाँच करत असते. याव्यतिरिक्त कंपनी रिलायन्स जिओच्या ‘माय जिओ’ (MyJio) या ॲपद्वारे ग्राहकांना एकाच वेळी एकाच ठिकाणी अधिक सेवाही उपलब्ध करून देत असते.
तर या सेवा कोणत्या आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ…
१. यूपीआय पेमेंट करा – जिओ पेमेंट्स बँकेद्वारे माय जिओ ॲपमार्फत तुम्ही यूपीआय आयडी असलेल्या मित्राला किंवा विक्रेत्याला त्वरित पैसे पाठवू शकता. गूगल पे किंवा फोन पेप्रमाणेच युजर्स माय जिओ ॲपद्वारे मोफत पैसे पाठवू आणि घेऊसुद्धा शकतात. पण, त्यासाठी तुम्हाला एक नवीन यूपीआय आयडी तयार करावा लागेल, जो भारतात कार्यरत असलेल्या जवळजवळ कोणत्याही बँकेशी लिंक केला जाऊ शकतो.
२. तुमच्या आणि तुमच्या मित्रांच्या जिओ मोबाईल कनेक्शनचे रिचार्ज करा – माय जिओ मोबाईल ॲपवरून , फायबर आणि एअर फायबरचा कोणताही रिचार्ज अतिरिक्त शुल्काशिवाय अगदी सहज करू शकता. जर तुम्ही पोस्ट पेड युजर असाल, तर तुम्ही माय जिओ ॲपमध्ये तुमचे बिलदेखील भरू शकता.
३. कॉलर ट्यून सेट करा – तुम्ही तुमच्या जिओ फोन नंबरवर माय जिओ ॲपद्वारे मोफत कॉलर ट्यून, ज्याला JioTunes असेही म्हणतात. ती तुम्ही सेट करू शकता. पण, लक्षात ठेवा की, हे ट्यून एका महिन्यानंतर आपोआप बंद होते आणि दर महिन्याला ते ॲपमध्ये पुन्हा ॲक्टिव्ह करावे लागते. याचा अर्थ असा की, तुम्हाला JioTune सेट करण्यासाठी JioSaavn ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही.
४. १०० जीबीपर्यंत क्लाउड स्टोरेज मिळवा – मायजिओ ॲप १०० जीबीपर्यंत मोफत क्लाउड स्टोरेजदेखील देते, जे मायक्रोसॉफ्ट, ॲपल व गूगलसारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी ऑफर केलेल्यापेक्षा खूपच जास्त आहे. हे स्टोरेज फोटो, व्हिडीओ, फाइल्स, म्युझिक आणि बरेच काही अपलोड करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
५. डू नॉट डिस्टर्ब अनेबल किंवा डिसेबल करा – जर तुम्हाला सतत येणाऱ्या स्पॅम कॉल्सचा त्रास होत असेल, तर तुम्ही MyJio ॲपवरील डू नॉट डिस्टर्ब पर्यायाद्वारे ते डिसेबल करू शकता. हे ॲप तुम्हाला कोणत्या प्रकारचे कॉल ब्लॉक करायचे आहेत किंवा अॅप प्रमोशनल आणि सर्व्हिससंबंधित कॉल्स आणि मेसेज ब्लॉक करायचे आहेत यावर बारीक नियंत्रण ठेवते.
६. इतर जिओ कनेक्शन व्यवस्थापित (मॅनेज) करा – जर तुम्ही जिओ फायबर किंवा एअर फायबर युजर्स असाल, तर तुम्ही मायजिओ ॲपद्वारे हे कनेक्शन व्यवस्थापित करू शकता आणि तुमच्या कनेक्शनशी संबंधित सर्व माहितीमध्ये प्रवेश करू शकता. यामध्ये तुमचा रिचार्ज प्लॅन बदलणे, तसेच जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असाल, तर तुम्ही काही क्लिकमध्ये तुमचे कनेक्शन नवीन ठिकाणी हलवण्याची विनंतीदेखील करू शकता.
७. किराणा सामानाची खरेदी करा – MyJio ॲप तुम्हाला कोणताही ॲप इन्स्टॉल न करता थेट जिओ मार्टवरून खरेदी करण्याची परवानगी देते. या प्लॅटफॉर्मचा वापर करून, तुम्ही किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक्स आणि बरेच काही खरेदी करू शकता.
तर मायजिओ (MyJio) ॲपवर तुम्ही अशा अनेक गोष्टी करू शकता. या प्लॅटफॉर्ममध्ये इतरही अनेक गोष्टी आहेत, ज्या फक्त ॲप एक्सप्लोर करून सहजपणे शोधता येतात.