रिलायन्स जिओकडे आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स आहेत. तसेच कंपनीकडे नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मचा मिळणारे देखील काही प्लॅन्स आहेत. रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओने देशामध्ये सर्वात पहिले ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. २०२३ च्या अखेरपर्यंत देशाच्या प्रत्येक भागामध्ये ५ जी सेवा पोचवण्याचे उद्दिष्ट जिओने ठेवले आहे. रिलायन्स जिओकडे दोन नेटफ्लिक्स प्रीपेड प्लॅन्स आहेत. तसेच एक पोस्टपेड प्लॅन देखील आहे. मात्र आज पण प्रीपेड प्लॅन्सबद्दल जाणून घेणार आहोत. या प्लॅनची किंमत अनुक्रमे १,०९९ रुपये आणि १,४९९ रुपये इतकी आहे.
रिलायन्स जिओचा १,०९९ रूपयांचा प्लॅन
जिओचा १,०९९ रुपयांचा प्लॅन हा नेटफ्लिक्स मोबाइलसह येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस व ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. तसेच हा प्लॅन ५ जी अनलिमिटेड ऑफरसह येतो. जर का तुमच्याकडे रिलायन्स जिओचे ५ जी नेटवर्क असेल तर तुम्हाला ५ जी अनलिमिटेड डेटाचा आनंद घेता येणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला जीओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. जिओसिनेमा प्रीमियम सबस्क्रिप्शन तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळत नाही . ते तुम्हाला वेगळे खरेदी करावे लागते. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
रिलायन्स जिओचा १,४९९ रूपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओचा १,४९९ रुपयांचा प्लॅन नेटफ्लिक्स बेसिकसह येतो. जिओच्या १, ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस व ८४ दिवसांची वैधता वापरकर्त्यांना मिळते. १,४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३ जीबी डेटा दररोज वापरायला मिळतो. तसेच हा प्लॅन ५ जी अनलिमिटेड ऑफरसह येतो. जर का तुमच्याकडे रिलायन्स जिओचे ५ जी नेटवर्क असेल तर तुम्हाला ५ जी अनलिमिटेड डेटाचा आनंद घेता येणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला जीओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. जिओसिनेमा प्रीमियम सबस्क्रिप्शन तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळत नाही . ते तुम्हाला वेगळे खरेदी करावे लागते. हे दोन्ही प्लॅन्स वापरकर्त्यांसाठी रिलायन्स जिओची वेबसाइट किना अधिकृत माय जिओ अॅपवर देखील उपलब्ध आहे.