Netflix हे लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. भारतातील बरेचसे लोक सब्सक्रिप्शन घेऊन नेटफ्लिक्सवरील चित्रपट, वेबसीरीज पाहत असतात. हे लोक आपल्या मित्रांना, नातेवाईकांना नेटफ्लिक्स अकाउंट शेअर करत असतात. आजही बहुतांश लोक दुसऱ्यांच्या अकाउंटवरुन नेटफ्लिक्स वापरत असल्याचे पाहायला मिळते. फक्त भारतातच नाही, तर जगभरातील यूजर्स आपले अकाउंट आणि पासवर्ड इतरांना देत असतात. यामुळे यूजर्सची संख्या वाढत नाही असे लक्षात आल्याने नेटफ्लिक्सने १०३ देशांमध्ये नेटफ्लिक्स अकाउंट शेअर करण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयाद्वारे कंपनी महसूल वाढवून बाजारामध्ये टिकण्याचा प्रयत्न करत आहे असे म्हटले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेटफ्लिक्स कंपनीने ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर यांसारख्या १०३ देशांमधील यूजर्सचे ईमेल मार्क केले आहेत. यूजर्सचे अकाउंट एकाच व्यक्तीने वापरावे असे या मेलमध्ये म्हटले आहे. पासवर्ड शेअरिंग रोखण्यासाठी नेटफ्लिक्सने प्रिमियम प्लॅन सब्सक्राइब केले नसलेल्या लोकांसाठी Add-supported option ची सोय केली आहे. जर एखाद्या यूजरला अकाउंटमध्ये अतिरिक्त सदस्याचा समावेश करायचा असेल; एखाद्या व्यक्तीला अकाउंट, पासवर्ड शेअर करायचे असेल, तर मासिक शुल्कासह यूजरला अतिरिक्त ६६० रुपये भरावे लागतील. असे करुन अकाउंट ट्रान्सफर करणे शक्य होणार असल्याचे नेटफ्लिक्सने अधिकृत मेलमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा – मोफत मिळेल Amazon Prime अन् Disney+ Hotstar, पाहा ‘या’ कंपनीचा सुपरहिट Plan, ‘असा’ मिळवा फायदा

“नेटफ्लिक्सचे अकाउंट शेअर करणाऱ्या अमेरिकेतील प्रत्येक यूजरला आम्ही आजपासून ईमेल पाठवणार आहोत. एक अकाउंट हे एका व्यक्तीपुरते मर्यादित आहे. एका घरातील व्यक्ती ही सेवा वापरु शकतात. आता यूजर्सना Transfer Profile, Manage Access अशा सुविधांचा लाभ घेता येणार आहे.” असे नेटफ्लिक्स कंपनीने यूजर्सना पाठवलेल्या मेलमध्ये नमूद केले आहे. हा नवा नियम लागू केलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश नसल्याचे म्हटले जात आहे. पण भविष्यात आपल्याकडेही या नियमाची अंमलबजावणी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflix changed password sharing rule now you cant share account with anyone extra money to be paid for account transfer know more yps