Netflix: सध्या सर्वत्र ओटीटी माध्यमांची चर्चा आहे. स्ट्रीमिंग सेवा देण्यामध्ये नेटफ्लिक्स ही कंपनी अग्रेसर आहे. जगभरामध्ये या कंपनीचे ग्राहक उपलब्ध आहेत. नेटफ्लिक्समुळे ओटीटी माध्यमाची सुरुवात झाली असेही म्हटले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये नेटफ्लिक्सचे मार्केटमधील स्पर्धेमध्ये मागे पडले आहे. अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार असे प्रतिस्पर्धी दिवसेंदिवस प्रगती करत असताना नेटफ्लिक्सच्या सबस्क्रायबर्सची संख्या कमी-कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे. ग्राहकांना आकर्षित करुन आर्थिक घडी सुधारण्यासाठी कंपनीद्वारे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
या संबंधित माहिती कंपनीच्या प्रवत्यांकडून देण्यात आली आहे. त्यांनी “आम्ही नेहमीच सबस्क्रायबर्सना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्यासाठी प्रत्येक ग्राहक महत्त्वपूर्ण आहे. काही देशांमध्ये आम्ही सबस्क्रीप्शनचे दर कमी करण्याचे ठरवले आहे” असे म्हटले आहे. यानुसार १०० पेक्षा जास्त देशांमध्ये १३ ते ६० टक्क्यांपर्यंत नेटफिक्स सबस्क्रीप्शनच्या किंमती कमी करण्यात येणार आहेत. या देशांमध्ये भारत नसल्यामुळे सध्या आपल्याकडे नेटफ्लिक्सची सुविधा त्याच दरामध्ये उपलब्ध असणार आहे. याआधीही कंपनीने ग्राहकांना सबस्क्रीप्शनमध्ये सवलती दिल्या होत्या.
नेटफ्लिक्सचे जगभरामध्ये सध्या २३० हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. असे असूनही कंपनीला आशिया आणि आफ्रिका खंडातील काही देशामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. नेटफ्लिक्सने घेतलेल्या या निर्णयावर लोकांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अधिकाधिक ग्राहकांनी नेटफ्लिक्सची सेवा घ्यावी यासाठी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Portable Washing Machine वापरुन व्हा टेन्शन फ्री; बादलीच धुणार दहा मिनिटांमध्ये मळके कपडे
सबस्क्रीप्शनच्या किंमती कमी केल्याने नेटफ्लिक्सच्या वार्षिक उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. यामुळे कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरले आहेत. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. त्यांनी अन्य कंपन्यासह काही प्रयोग देखील केले आहेत. आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी नेटफ्लिक्सने घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे भविष्यामध्ये कळणार आहे.