Netflix plans 2024: भारतासह जगभरात ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन चित्रपट, सीरियल, डॉक्युमेंट्री, वेब सीरिज पाहणाऱ्यांचा कल वाढतच चालला आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला या प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा आनंद घेता येतो. मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्मनी रिचार्ज प्लॅन महाग केल्याने युजर्स काही ठराविक प्लॅटफॉर्म्सकडे वळताना दिसत आहेत. तर काही मोबाइल कंपन्यासुद्धा त्यांच्या प्लॅनवर नेटफ्लिक्ससाठी ऑफर्स घेऊन येत असतात. तर या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नेटफ्लिक्स या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मने अनेक नवे प्लॅन बाजारात आणले आहेत.
नेटफ्लिक्सची सेवा काही दिवस, एक महिना आणि एक वर्षांसाठी उपलब्ध असते. तर सध्या नेटफ्लिक्स भारतात चार वेगवेगळे म्हणजेच मोबाइल, बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम आदी चार स्वरुपाचे प्लॅन घेऊन आली आहे. या नेटफ्लिक्स प्रीपेड योजना वेगवेगळ्या वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केल्या आहेत. या नेटफ्लिक्स प्लॅन्सची किंमत १४९ रुपयांपासून ते ६४९ रुपयांपर्यंत असणार आहे. चला तर या चारही सबस्क्रिप्शन प्लॅन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
भारतातील किंमत आणि फायदे :
नेटफ्लिक्स मोबाइल प्लॅन्स :
जे युजर्स मोबाइलवर वेबसिरीज, चित्रपट, सिनेमा पाहण्याचा आनंद घेताना त्यांच्यासाठी हा प्लॅन असणार आहे. याची किंमत १४९ रुपये प्रति महिना असणार आहे. भारतात उपलब्ध असलेला हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला व्हिडीओची गुणवत्ता 480p रिझोल्यूशन मिळेल. ॲण्ड्रॉइड, टॅब्लेट, आयफोन्स आणि आयपॅड वापरकर्ते याचा आनंद घेऊ शकतात. तसेच फक्त एका डिव्हाइसवर कन्टेन्ट डाउनलोड केला जाईल. हा प्लॅन वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी असेल, जे प्रवासात येता-जाता नेटफ्लिक्स बघणे पसंत करतात.
नेटफ्लिक्स बेसिक प्लॅन्स :
तुम्ही तुमच्या फोनशिवाय तुमचा टॅब्लेट, कॉम्प्युटर किंवा टीव्ही नेटफ्लिक्सवर कंटेन्ट पाहत असाल, तर १९९ रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. पण, नेटफ्लिक्सच्या या बेसिक प्लॅनमध्ये तुम्ही नेटफ्लिक्स एकावेळी एकाच स्क्रीनवर ऑपरेट करू शकता. यामध्ये तुम्हाला व्हिडीओची गुणवत्ता 720p रिझोल्यूशनमध्ये उपलब्ध आहे.
नेटफ्लिक्स स्टँडर्ड प्लॅन्स :
नेटफ्लिक्सच्या या प्लॅनमध्ये युजर्स एकाच वेळी दोन भिन्न डिव्हाइसवर कंटेन्ट पाहू शकतात. या प्लॅनची किंमत ४९९ रुपये प्रति महिना आहे. यामध्ये तुम्हाला व्हिडीओची गुणवत्ता 1080p रिझोल्यूशन उपलब्ध आहे. तसेच तुम्ही मोबाइल फोन, टॅब्लेट, संगणक आणि टीव्हीसह एकाच वेळी दोन उपकरणांवर याचा वापर करू शकता. तसेच तुम्ही दोन्ही उपकरणांवर कन्टेन्ट ऑफलाइन सुद्धा डाउनलोड करू शकता. जोडप्यांसाठी किंवा लहान कुटुंबांसाठी हा प्लॅन डिझाइन करण्यात आला आहे.
नेटफ्लिक्स प्रीमियम योजना:
प्रीमियम प्लॅनची किंमत प्रति महिना ६४९ रुपये आहे. हे मोठ्या कुटुंबांसाठी किंवा मित्र-मैत्रिणींच्या मोठ्या ग्रुपसाठी डिझाइन केलं आहे. तसेच तुम्हाला मोबाइल डिव्हाइस आणि टीव्हीवर 4K गुणवत्तेवर हाय-डेफिनिशन स्ट्रीमिंग उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त सहा भिन्न उपकरणांवर कंटेन्ट डाउनलोड करण्याची संधी मिळते.