Netflix हे एक लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये ग्राहकांना आपले आवडते पिक्चर,टीव्ही शो आणि अन्य कार्यक्रम पाहता येतातमागच्या . काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सने भारतात पासवर्ड शेअरिंग बंद केले आहे. आता नेटफ्लिक्सने वापरकर्त्यांसाठी एक नवीन टॅब आणला आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना अनेक फायदे मिळणार आहेत. तर ते टॅब किंवा फिचर कोणते आहे ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्ट्रीमिंग जायंट नेटफ्लिक्सने अँड्रॉइड आणि iOS साठी एक नवीन ‘Personalised Tab’ सादर केला आहे. जो वापरकर्त्यांना त्यांना काय पाहायचे आहे ते निवडण्यासाठी मदत करतो. ‘माय नेटफ्लिक्स’ टॅब सध्या iOS वर रोल आउट होत आहे आणि पुढील महिन्याच्या सुरुवातीला ते अँड्रॉइडवर उपलब्ध होईल असे कंपनीने सोमवारी आपल्या एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

हेही वाचा : Best Smartphones Under 10000: रिअलमी Narzo N53 सह ‘हे’ आहेत दमदार फीचर्स असणारे स्मार्टफोन्स, ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि…

स्ट्रीमिंग जायंटच्या मते नवीन टॅब ”वन स्टॉप शो आहे जे तुमच्यासाठी सोप्या शॉर्टकटसह तयार केले गेले आहे. जे तुम्हाला तुम्हाला काय पाहायचे हे नवीवंडण्यासाठी मदत करेल.” या नवीन टॅबमध्ये वापरकर्ते त्यांचे डाउनलोड , टीव्ही शो आणि त्यांनी थंब्स अप केलेलं पिक्चर आणि लिस्टमध्ये जोडलेले सेव्ह केलेलं शो, त्यांनी पाहिलेले ट्रेलर आणि अन्य जे असेल ते पाहू शकणार आहेत.

”जेव्हा तुम्ही तुमचा फोन घेऊन फिरत असता तेव्हा थेट My Netflix वर जा. जिथे तुम्ही सेव्ह केलेले किंवा पाहण्यासाठी डाउनलोड केलेले निवडू शकता जे तुम्हाला पाहायचे आहे. ” कंपनी म्हणाली. त्याशिवाय, वापरकर्ते अजूनही होम टॅब आणि इतर Apps च्या विभागांना भेट देऊन सिरीयल आणि पिक्चरचे संपूर्ण कॅटलॉग सर्च करू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflix introduced personalized mobile tab my netflix android and ios users check details tmb 01