गेल्या काही दिवसात ओटीटी कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे चांगल्या कंटेंटसह स्वस्त ओटीटी प्लॅटफॉर्मकडे ग्राहकांचा कल वाढला. त्यामुळे ही स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. कंपन्या आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या प्लानच्या किमती कमी करत आहे. या दिशेने नेटफ्लिक्सनंही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसात कमी झालेली ग्राहकांची पुन्हा रुळावर आणण्यासाठी एक योजना आखली जात आहे. नेटफ्लिक्सला दशकाहून अधिक काळातील पहिला ग्राहक तोटा सहन करावा लागला आहे. ज्यामुळे त्याचे शेअर्स २५ टक्के घसरले. मंगळवारी जाहीर झालेल्या तिमाही कमाईच्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीच्या ग्राहक संख्येत २,००,००० ग्राहकांची घट झाली आहे. ओटीटीवर दोन प्रकारच्या वेब सिरीज आणि चित्रपट प्रसारित केले जात आहेत. जाहिरात आधारित आणि ग्राहक आधारित असे प्लान आहेत. मनोरंजनाचा मजकूर फुकट पाहतात त्यांना मधेच जाहिराती पहाव्या लागतात आणि ज्यांना जाहिरातीशिवाय चित्रपट आणि वेब सिरीज बघायच्या आहेत, त्यांना त्यासाठी अधिकचे पैसे द्यावे लागतात.

ग्राहकांचा ओढा वाढवा यासाठी जाहिरातींसह कमी किमतीत प्लान तयार करण्याची योजना आहे. सह सीईओ रीड यांनी सांगितलं की, “ग्राहकांना स्वस्त पर्याय उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.” यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांचा कल वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Netflix ला बसला जबरदस्त धक्का! गेल्या ३ महिन्यात गमावले ‘इतके’ ग्राहक; जाणून घ्या कारण

नेटफ्लिक्ससाठी आशिया ही सर्वात लहान बाजारपेठांपैकी एक आहे. नेटफ्लिक्सच्या सबस्क्रायबरच्या बाबतीत सर्वात मोठी बाजारपेठ उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि नंतर युरोप आहे. नेटफ्लिक्सचे आशियामध्ये एकूण ३.२६ कोटी सबस्क्रायबर आहेत, जे त्याच्या एकूण सबस्क्रायबर संख्येच्या १४ टक्के आहे. नेटफ्लिक्सचे एकूण २२.१८ कोटी सबस्क्रायबर आहेत. नेटफ्लिक्स आता आपली वाढ आणि ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी आशियासह इतर बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या काही तिमाहीत नेटफ्लिक्सचे बहुतांश सबस्क्रायबर आशियामधून आले आहेत आणि जपान आणि दक्षिण कोरियामध्ये कंपनीच्या यशाचे श्रेय याला दिले जाते. नेटफ्लिक्सला जपान आणि दक्षिण कोरियामध्ये सारखेच यश मिळाले असले तरी भारतात मात्र अद्याप तेच यश मिळालेले नाही. नेटफ्लिक्ससाठी भारतीय बाजारपेठ अजूनही एक गूढ आहे आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मचीही नेटफ्लिक्ससाठी कठोर स्पर्धा आहे.

Story img Loader