गेल्या काही दिवसात ओटीटी कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे चांगल्या कंटेंटसह स्वस्त ओटीटी प्लॅटफॉर्मकडे ग्राहकांचा कल वाढला. त्यामुळे ही स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. कंपन्या आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या प्लानच्या किमती कमी करत आहे. या दिशेने नेटफ्लिक्सनंही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसात कमी झालेली ग्राहकांची पुन्हा रुळावर आणण्यासाठी एक योजना आखली जात आहे. नेटफ्लिक्सला दशकाहून अधिक काळातील पहिला ग्राहक तोटा सहन करावा लागला आहे. ज्यामुळे त्याचे शेअर्स २५ टक्के घसरले. मंगळवारी जाहीर झालेल्या तिमाही कमाईच्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीच्या ग्राहक संख्येत २,००,००० ग्राहकांची घट झाली आहे. ओटीटीवर दोन प्रकारच्या वेब सिरीज आणि चित्रपट प्रसारित केले जात आहेत. जाहिरात आधारित आणि ग्राहक आधारित असे प्लान आहेत. मनोरंजनाचा मजकूर फुकट पाहतात त्यांना मधेच जाहिराती पहाव्या लागतात आणि ज्यांना जाहिरातीशिवाय चित्रपट आणि वेब सिरीज बघायच्या आहेत, त्यांना त्यासाठी अधिकचे पैसे द्यावे लागतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा