सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असून प्रवासादरम्यान अनेक जण ओटीटीवर चित्रपट किंवा वेब सीरिज पाहताना दिसतात. मात्र सर्वच ओटीटी प्लॅटफॉर्म परवडणारे नसल्याने ठराविक निवडले जातात. त्यात नेटफ्लिक्स हे सर्वात लोकप्रिय ओटीटी आहे. मात्र त्याचं मासिक भाडं प्रत्येकालाच परवडेल असं नाही. आता ओटीटी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इतर ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या मासिक शुल्कात वाढ केली असताना नेटफ्लिक्सने आपल्या मासिक शुल्कात कपात केली आहे. २०१६ पासून नेटफ्लिक्स भारतात सेवा देत असून पहिल्यांदाच आपल्या दरात कपात केली आहे. भारतातील ओटीटीमधील तीव्र स्पर्धा पाहता हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. नेटफ्लिक्सच्या दरांमुळे अनेक जण त्याकडे पाठ फिरवत होते. नेटफ्लिक्स डिस्ने+ हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी एंटरटेनमेंटचे ZEE5 आणि सोनी पिक्चर्स नेटवर्कचे SonyLIV यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा