व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा देणारी कंपनी नेटफ्लिक्सचे २ लाखांहून अधिक ग्राहक कमी झाले आहेत. यानंतर आता नेटफ्लिक्सने पुनरागमन करण्यासाठी एक वेगळीच योजना आखली आहे. जे उपभोक्ते कुटुंबाव्यतिरिक्त इतरांसोबत आपले खाते शेअर करत असतील त्यांच्यासाठी नेटफ्लिक्सने नवा नियम जारी केला आहे. टेक क्रंचच्या मते, कंपनीने मार्चमध्ये चिली, कोस्टारिका आणि पेरूमध्ये या नव्या नियमाची चाचणी सुरू केली. परंतु आता पुढील एका वर्षात हा नियम जागतिक स्तरावर आणण्याची कंपनीची योजना आहे.

हा नवीन नियम म्हणजे, जे वापरकर्ते कुटुंबाबाहेरील लोकांसह खाती शेअर करतील त्यांच्यासाठी कंपनी अधिक शुल्क आकारेल. नेटफ्लिक्सने म्हटले आहे की या बदलाची चाचणी घेण्यासाठी जवळपास एक वर्ष लागेल आणि मग हे सुनिश्चित केले जाऊ शकते की जे वापरकर्ते आपले खाते त्यांच्या कुटुंबाबाहेरील लोकांसह शेअर करतात त्यांच्याकडून किती शुल्क आकारले जाईल.

UPI Fraud : सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी पाच सोप्या स्टेप्स; आजच करा फॉलो

कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी ग्रेग पीटर्स यांनी सांगितले की, कंपनी गेली दोन वर्षे या दिशेने काम करत आहे. त्याची नुकतीच चाचणी करण्यात आली आणि योग्य शुल्क शोधण्यासाठी थोडा वेळ लागेल. नेटफ्लिक्स काही ठिकाणी वापरकर्त्यांना मानक आणि प्रीमियम सबस्क्रिप्शनसह उप-खाती (सब-अकाउंट) जोडण्याची परवानगी देखील देत आहे. हे उप-खाते अशा लोकांसाठी आहे जे ग्राहकांसोबत राहत नाहीत.

प्रत्येक उप-खात्याचे स्वतःचे प्रोफाइल आणि रेकमेंडेशन इत्यादी असेल. ते जीपीएस आधारित नसेल. तो आयपी ऍड्रेस, डिव्हाइस आयडी इत्यादी वापरेल आणि यावरून हे कळेल की यूजर्स त्यांचे अकाउंट घराबाहेरील लोकांसोबत शेअर करत आहेत की नाही.

Story img Loader