भारतात ओटीटी वापरण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलं आहे. नव्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहण्यासाठी आवडत्या ओटीटी अ‍ॅपला पसंती दिली जात आहे. यामुळे ओटीटी कंपन्यांमध्ये चांगला कंटेन्ट देण्यासोबत शुल्काबाबत स्पर्धा रंगली आहे. ग्राहकही स्वस्त आणि मस्त प्लान असलेल्या ओटीटी अ‍ॅपकडे धाव घेत आहेत. यूएस-आधारित ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने सबस्क्राइबर वाढवण्यासाठी विविध प्लानच्या किंमती कमी केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉन प्राइमने आपल्या प्लानच्या किंमती वाढवल्या होत्या. तर डिस्ने हॉटस्टारने १ सप्टेंबरपासून नव्या प्लानची घोषणा केली आहे. ४९९ रुपयांपासून १४९९ रुपयांपर्यंत प्लान आहेत. त्यामुळे आता भारतीय ग्राहक कोणतं ओटीटी चॅनेल परवडतं याकडे धाव घेत आहेत. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने हॉटस्टार यापैकी कोणता प्लान कसा आहे पाहूयात.

नेटफ्लिक्स

  • मोबाईल प्लान १९९ रुपयांवरून १४९ रुपये केला आहे.
  • बेसिक प्लान ४९९ रुपयांवरून १९९ रुपये केला आहे.
  • स्टँडर्ड प्लान ६४९ रुपयांवरून ६४९ रुपये केला आहे.
  • प्रिमिअम प्लान ७९९ रुपयांवरून ६४९ रुपये केला आहे.

Netflix च्या दरात मोठी कपात; नवे दर काय आहेत? वाचा

अ‍ॅमेझॉन प्राइम

  • वार्षिक पॅकेज ५०० रुपयांनी वाढवलं असून आता त्याची किंमत १४९९ रुपये इतकी आहे. यापूर्वी हे पॅकेज ९९९ रुपयांना मिळत होतं
  • मासिक पॅकेज १२९ रुपयांवरून १७९ रुपये करण्यात आलं आहे.
  • त्रैमासिक पॅकेज ३२९ रुपयांवरून ४५९ रुपये करण्यात आलं आहे.

डिस्ने+हॉटस्टार

  • मोबाईल फोनसाठी सर्वात स्वस्त म्हणजे ४९९ रुपयांचा प्लान आहे. यात एचडी क्वालिटी आहे.
  • दोन डिव्हाइससाठी ८९९ रुपयांचा प्लान आहे. यात दोन डिव्हाइस टॅबलेट, टीव्ही किंवा मोबाईल असू शकतो
  • चार डिव्हाइसाठी १४९९ रुपयांचा प्लान आहे. एकदा वापरकर्त्यांनी संख्या ४ पेक्षा जास्त झाली तर मागील लॉगइन पैकी एक आपोआप लॉगआउट होते.

Story img Loader