चांगले आणि अनोखे चित्रपट, तसेच मालिका पहायला मिळत असल्याने नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम हे ओटीटी प्लॅटफॉर्म लोकांचे आवडते ठिकाण झाले आहेत. पैसे देऊन लोक त्यावरील मनोरंजक सामग्री पाहतात. पण जर तुम्ही खाते उघडून सब्सक्रिप्शन न घेता फुकटातच नेटफ्लिक्स बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे.

पासवर्ड शेअरींग आता पेड फीचर होणार आहे. जर तुम्ही तुमच्या नेटफ्लिक्स खात्याचे पासवर्ड दुसऱ्या व्यक्तीला शेअर करत असाल तर आता यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. नेटफ्लिक्सने प्रोफाइल ट्रान्सफर फीचरची घोषणा केली आहे. या फीचरच्या माध्यमातून पासवर्ड शेअरींगला आळा घालण्याचा कंपनीचा मानस आहे.

(IPAD 2022 आणि IPAD PRO 2022 ५ जीसह लाँच; मुलांना आवडेल ‘हा’ खास फीचर, जाणून घ्या किंमत)

२०२३ पासून हे फीचर लागू झाल्यावर पासवर्ड शेअर करण्यासाठी सब अकाउंट तयार करावे लागेल, यासाठी पैसे द्यावे लागतील. याने परिचितांच्या खात्यांची माहिती घेऊन नेटफ्लिक्स वापरता येणार नाही. त्यामुळे, फुकटात नेटफ्लिक्सची दर्जेदार सामुग्री पाहणाऱ्या लोकांना मोठा फटका बसणार आहे.

इतके पैसे द्यावे लागतील

नेटफ्लिक्सचे सबस्क्राइबर्स घटले असून कंपनीला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पासवर्ड शेअरींग हे या नुकसानी मागील मोठे कारण असल्याचे नेटफ्लिक्सचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने लॉगिन शेअर करणाऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेण्याची घोषणा केली आहे. सुत्रांनुसार, पासवर्ड शेअरींगसाठी २५० ते ३३० रुपये खर्च करावे लागू शकतात. भारतात किंमत किती असेल आणि कधी हे फीचर सुरू होईल याबाबत माहिती मिळालेली नाही.

Story img Loader