Call Recording: कॉल रेकॉर्डिंग (Call Recording) बेकायदेशीर आहे. हे पाहता गुगलने काही काळापूर्वी कॉल रेकॉर्डिंगसह थर्ड पार्टी ॲप्सही (Third Party app) बंद केले होते. म्हणजेच थर्ड पार्टी ॲपच्या मदतीने कॉल रेकॉर्डिंग करता येत नाही. यासाठी यूजरला फोनचे इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर वापरावे लागेल. मात्र, इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर ऑन केल्यावर समोरच्या व्यक्तीला त्याची माहिती मिळते. पण, अनेकवेळा असे घडते की, समोरची व्यक्ती आपले कॉल रेकॉर्ड करत असते आणि आपल्याला माहितीही नसते.

‘हे’ ॲप झाले विकसित

आता कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी O Dialer App लाँच करण्यात आले आहे. Oppo ने आपले O Dialer ॲप लाँच केले आहे. गेल्या वर्षी, Google ने Play Store वरून सर्व तृतीय पक्ष कॉल रेकॉर्डिंग ॲप्स काढून टाकले, तेव्हापासून स्मार्टफोन निर्माते त्यांच्या डिव्हाइसमध्ये हे वैशिष्ट्य एकत्रित करण्याच्या तयारीत व्यस्त आहेत. काही OEM म्हणजे स्मार्टफोन निर्मात्यांनी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये डायलर म्हणून Google फोन ॲप वापरण्यास सुरुवात केली आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी

(हे ही वाचा : BSNL Recharge Plan: Jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी BSNL ने लाँच केला सर्वात स्वस्त Plan! )

‘या’ स्मार्टफोनमध्ये O Dialer App करेल काम

Oppo ने नवीन ColorOS ॲपसह एक नवीन डायलर जोडला आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर ODialer App या नावाने ओळखले जाते. हे ॲप Realme, OnePlus आणि Oppo फक्त या फोनमध्ये वापरले जाऊ शकते. OnePlus, Oppo आणि Realme च्या स्मार्टफोन्ससाठी एक नवीन हे ॲप कॉल रेकॉर्डिंग फीचरला सपोर्ट करते. विशेष बाब म्हणजे, हे डायलर ॲप सॅमसंग, शाओमी किंवा इतर कोणत्याही ब्रँडच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये वापरता येणार नाही. तसेच, हे ॲप फक्त Android 12 किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करते.

ODialer App ची वैशिष्ट्ये

Oppo च्या या ODialer ॲपमध्ये कॉल मॅनेजमेंट फीचर उपलब्ध आहे, जे तुमच्या गरजेनुसार ग्रुपमध्ये अलीकडील कॉल्सचे आयोजन करते. याशिवाय, कॉल रेकॉर्डिंग फीचर देखील यामध्ये उपलब्ध आहे, जेव्हा ते सक्षम केले जाते, तेव्हा दुसर्‍या बाजूच्या वापरकर्त्याला कॉल रेकॉर्ड होत आहे हे कळत नाही. ODialer चा इंटरफेस अतिशय स्वच्छ आणि वापरण्यास सोपा आहे. यामध्ये स्पीड डायल फीचर देखील देण्यात आले आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते कॉन्टॅक्ट ठेवू शकता.

Story img Loader