एखादी स्टोरी पोस्ट करताना आता वापरकर्त्यांना त्यांना हवे ते टॅम्पलेट ॲड करता येणार आहे. हे ‘ॲड युअर्स’ नावाच्या एका नवीन फिचरमुळे शक्य होणार आहे. याचा वापर करून, वापरकर्ते जीआयएफ [Gif], फोटो, स्टिकर, एखादा मजकूर असे त्यांना हवे ते स्टोरीमध्ये लावून शेअर करू शकतात. इन्स्टाग्रामचे हे नवे फिचर नुकतेच आले असून, त्याचा वापर कसा करायचा ते पाहा.
‘ॲड युअर्स’ हे टेम्प्लेट कसे तयार करायचे?
यासाठी तुम्हाला आधी नेहमी स्टोरी बनवतो त्याप्रमाणे, गॅलरीमधून हवे असणारे फोटो, स्टिकर, Gif किंवा एखादा मजकूर ॲड करून घ्या. त्यानंतर ॲड युअर्स टेम्प्लेट हे स्टिकर सिलेक्ट करून, तुम्हाला स्टोरीमध्ये जे काही पिन करायचे असेल ते पिन करा.
परंतु लक्षात ठेवा की, हे ॲड युअर्स टेम्प्लेट तुम्ही स्टोरीवर शेअर केल्यानंतर इतर वापरकर्तेदेखील यामध्ये त्यांना हवे असणारे घटक ॲड करू शकतात. परंतु, मूळ वापरकर्त्याशिवाय इतर कुणीही ते शेअर करू शकत नाहीत.
हेही वाचा : व्हॉट्सॲपवरील महत्त्वाचे चॅट्स कसे ठेवाल डोळ्यांसमोर? जाणून घ्या मेटाने आणलेल्या ‘या’ नव्या फीचरबद्दल….
इतरांनी शेअर केलेले ॲड युअर्स टेम्प्लेट कसे वापरावे?
इतरांनी शेअर केलेल्या स्टोरीमध्ये ॲड युअर्स टेम्प्लेट दिसल्यानंतर त्यामधील ॲड युअर्सचा पर्याय निवडावा. त्यावर क्लिक केले की तुम्हाला कॅमेरा हा पर्याय दिसेल. जिथे तुम्हाला इतरांची सर्व एलिमेंट्स दिसतील. त्यानंतर तुम्हाला हवे असलेले फोटो, मजकूर किंवा Gif त्यामध्ये ॲड करा. डावीकडे काही चेहरे दिसत असतील; तर ते चेहरे कोणीकोणी या टेम्प्लेटचा वापर केला आहे, हे दर्शवण्यासाठी असतात.
आतापर्यंतचे तिसरे नवे फिचर
मेटाच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया ॲपचे हे काही दिवसांत आणलेल्या नवीन फिचर्सपैकी तिसरे फिचर आहे. याआधी म्हणजेच मागच्याच आठवड्यात, इन्स्टाग्रामने व्हिडीओ नोट्स हे नवीन फिचर आणले असून त्यामध्ये चॅटमध्ये सर्वात वरतीअसणाऱ्या ‘नोट्स’मधून आता फोटो आणि व्हिडीओ दोन्हीही शेअर करू शकता. त्यासोबतच, आर्टिफिशल इंटेलिजन्स [artificial intelligence – AI] म्हणजेच एआयचा वापर करून बॅकड्रॉप हेसुद्धा एक फिचर आणले असल्याची माहिती, हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजते.