सोशल मीडियावर अनेक ॲप आहेत जिथे स्कोल करत असताना आपल्याला अनेक गोष्टी आवडतात. ज्यात पिकनिक स्पॉट, महत्वाची माहिती, एखाद्या ड्रेसचा डिझाइन आदींचा समावेश असतो. इन्स्टाग्राम या ॲपवर तुम्हाला एखादा रील, फोटो सेव्ह करण्यासाठी फोल्डर बनवण्याचा पर्याय दिला जातो. पण, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही गूगल ॲपवर सुद्धा ही गोष्ट अगदी सहज करू शकता. अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये गूगल ॲप हे आधीच इनबिल्ड असते. तर या ॲपमध्ये एक खास फीचर आहे. या फीचरचे नाव गूगल कलेक्शन असे आहे. हे फीचर वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी फोटो, व्हिडीओ , वेब पेज, पाककृती आदी अनेक गोष्टी एकाच ठिकाणी सेव्ह करण्याची परवानगी देतात. तर आज आपण या फीचरचा उपयोग कसा करायचा हे पाहणार आहोत.
नवीन गूगल कलेक्शन (फोल्डर) कसे तयार कराल :
१. गूगल फोल्डरमध्ये (कलेक्शन) प्रवेश करण्यासाठी किंवा नवीन फोल्डर तयार करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसच्या गूगल ॲपवर जा. तळाशी दिसणाऱ्या ‘सेव्ह’ बटणावर टॅप करा.
२. सेव्ह पर्यायाच्यावर तुम्हाला उजवीकडे प्लस चिन्ह (+) दिसेल त्यावर टॅप करा. तुम्हाला तिथे १. लिंक, २. ब्लँक आणि ३. ऑल सेव्ह हे तीन पर्याय दिसतील. तुम्ही या तिघांपैकी एक पर्याय निवडा
३. तीन पर्यायांपैकी एकावर टॅप केल्यावर फोल्डरला नाव द्या, तुम्हाला हवे असल्यास तिथे तुम्ही फोल्डरचे वर्णन देखील करू शकता. त्यानंतर ‘डन ‘ वर टॅप करा. तुम्हाला फोल्डर तयार झालेला दिसेल.
गुगल फोल्डरमध्ये तुमच्या आवडत्या गोष्टी कश्या पद्धतीने समाविष्ट कराल :
१. गूगल ॲप ओपन करा. सर्च बटनावर क्लिक करा.
२. तुम्हाला वेब पेज किंवा एखादी लिंक फोल्डरमध्ये (Collection) ॲड करायची आहे ती ओपन करा.
३. स्क्रिनवर तुम्हाला माहिती दिसेल. तेव्हा उजव्या कोपऱ्यात बूकमार्क आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला स्क्रिनवर ‘इट इस ॲड टू युअर कलेक्शन’ म्हणजेच तुमचा वेब पेज कलेक्शनमध्ये ॲड झाला आहे असा संदेश तुम्हाला आलेला दिसेल.
४. तसेच या व्यतिरिक्त तुम्हाला ही लिंक किंवा वेब पेज दुसऱ्या फोल्डरमध्ये (Collection) ठेवायचा असल्यास तुम्ही एडिट बटनावर क्लिक करा किंवा एखादा नवीन फोल्डर तयार करा.
५. तुम्ही गूगल ॲपमधील ‘सेव्ह’ टॅबवर जा. तुमच्या आवडीच्या फोल्डरवर टॅप करा आणि ‘प्लस’ (+) बटण दाबून लिंक, फोटो आणि इतर गोष्टी ॲड करा.
६. तसेच एखादा अल्बम डिलीट, एडिट किंवा रिऑर्डर करण्यासाठी गूगल ॲपमधील सेव्ह केलेल्या टॅबवर जा. तिथे तुम्हाला ही प्रक्रिया करण्याचे पर्याय दिसतील.
गूगल फोल्डरमध्ये तुम्हाला यूट्यूबचा एखादा व्हिडीओ ॲड करायचा असल्यास तेथील तीन डॉट या मेनूवर टॅप करा. शेअर बटण दाबा आणि गुगल ॲप या आयकॉनवर टॅप करा. जर गूगल हा पर्याय तुम्हाला दिसला नाही. तर शेअर लिस्टमध्ये खाली स्क्रोल करा. तुम्हाला पर्याय दिसून दिसेल. अशाप्रकारे तुम्ही गूगलमध्ये अनेक गोष्टी एकाच ठिकाणी शेअर करू शकता.