व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉटसअ‍ॅपवरून सहज फोटो, व्हिडीओ, पीडीएफ फाइल्स, व्हॉइस नोट शेअर करता येतात; त्यामुळे व्हॉटसअ‍ॅपवरून संपर्क साधण्याला प्राधान्य दिले जाते. व्हॉटसअ‍ॅपकडुन युजर्सना अ‍ॅप वापरताना अधिक सुविधा व्हावी यासाठी अनेक फीचर्स लाँच केले जातात. अशाच एका फीचरची सध्या चर्चा सूरू आहे. या नव्या फीचरचा वापर करून युजर्सना व्हॉटसअ‍ॅप स्टेटसमध्ये व्हॉइस नोट शेअर करता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘व्हॉटसअ‍ॅप बीटा इन्फो’ या व्हॉटसअ‍ॅपबाबत अपडेटची माहिती देणाऱ्या वेबसाईटवरून या नव्या फीचरची माहिती देण्यात आली. या फीचरचा वापर करून आयओएस युजर्सना व्हॉटसअ‍ॅप स्टेटसमध्ये ३० सेकंदांपर्यंतची व्हॉइस नोट शेअर करता येणार आहे. या व्हॉइस नोटबरोबर टेक्स्ट मेसेजही शेअर करता येणार आहे.

आणखी वाचा : व्हॉटसअ‍ॅप स्टेटसमध्ये YouTube Shorts अपलोड करता येणार; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

स्टेटस कोणत्या व्यक्ती पाहू शकतात हे जसे निवडता येते, त्याचप्रमाणे व्हॉइस नोट शेअर केलेला स्टेटस कोणाबरोबर शेअर करायचा आहे हे देखील निवडता येणार आहे. अँड्रॉइड युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध नसेल, आयओएस युजर्ससाठी लवकरच हे फीचर उपलब्ध होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New feature on whatsapp soon users will get to share voice note on status pns