आपण सकाळी घरातून बाहेर जाताना एकदा फोन चार्ज केला की तो फक्त अर्धा दिवस किंवा तुमचा वापर कमी असल्यास संध्याकाळपर्यंत काम करतो. मात्र, १५-२० टक्क्यांवर आलेल्या फोनची बॅटरी फूल करण्यासाठी, त्याला पुन्हा चार्जिंगला लावावे लागते. मात्र, ‘एकदा चार्ज केलेला फोन किंवा बॅटरी, अखंड ५० वर्षांपर्यंत काम करत राहील’ असे तुम्हाला कुणी सांगितले तर? तुमचा एक तर त्यावर विश्वास बसणार नाही किंवा तुम्ही समोरच्याला काहीही बडबडतोय, असे म्हणून त्याच्याकडे लक्ष देणार नाही.

मात्र, चीनमधील एका स्टार्टअप कंपनीने खरंच अशा जबरदस्त बॅटरीचा शोध लावलेला आहे, अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते. त्यानुसार, ‘बेटावोल्ट [Betavolt] नावाच्या या चिनी स्टार्टअप कंपनीने, न्यूक्लियर म्हणजेच अणुऊर्जेचे तंत्रज्ञान वापरून नाण्याच्या आकाराची एक बॅटरी बनवली आहे, असे बेटावोल्ट कंपनी सांगते.

smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
nashik special campaign for provide electricity connections to Zilla Parishad owned Anganwadi
७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
ILT20 2025 Dubai Capitals beat MI Emirates by1runs Gulbadin Naib Player of the match
ILT20 2025 : दुबईने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला चारली पराभवाची धूळ, निकोलस पूरनचे अर्धशतक ठरले व्यर्थ

हेही वाचा : Samsung चा नवीन स्मार्टफोन आयफोन १५ पेक्षाही भारी? काय आहेत दोघांमधील फरक जाणून घ्या…

खरंच हा आविष्कार किंवा शोध म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाच्या दिशेने अजून एक पाऊल आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. न्यूक्लियर म्हणजे अणुऊर्जेसारखी मोठी ऊर्जा एखाद्या नाण्याइतक्या लहानश्या जागेमध्ये बसवणे ही स्पेस आणि न्यूक्लियर तंत्रज्ञानात खूपच मोठी गोष्ट आहे. “बेटावोल्ट ॲटोमिक एनर्जी बॅटरीजमध्ये भरपूर वेळ काम करण्याची प्रचंड ताकद आहे. त्यामुळे तिचा अनेक उपकरणांमध्ये उपयोग केला जाऊ शकतो. ऐरोस्पेस [aerospace], AI साधने, वैद्यकीय उपकरणे, मायक्रोप्रोसेसर्स, प्रगत सेन्सर्स, तसेच लहान ड्रोन्स आणि मायक्रो रोबोट्स यांसारख्या सर्व यंत्रांमध्ये या बॅटरीची मदत होऊ शकते”, असे या कंपनीचे म्हणणे आहे.

अशा या शक्तिशाली बॅटरीच्या प्रोटोटाइपवर सध्या चाचणी सुरू असून, लवकरच आपल्या फोनमध्ये किंवा अगदी ड्रोनमध्ये ही बॅटरी बसवली जाऊ शकते. यामुळे भविष्यात बॅटरीचा काम करण्याचा दर्जा प्रचंड वाढणार आहे.

हेही वाचा : पेट्रोल पंपावर तुमची फसवणूक तर होत नाही ना? वाहनात पेट्रोल भरताना ‘या’ पाच टिप्स लक्षात ठेवा

मात्र, यामध्ये अणुऊर्जा वापरली असल्याने तुम्हाला ही बॅटरी कितपत सुरक्षित असू शकते, असा प्रश्न पडला असेल. तर या बॅटरीच्या लेयर्ड रचनेमुळे ती पेट घेणार नाही. ही बॅटरी फायर रेझिस्टंट असल्याने उष्ण किंवा थंड अशा अगदी कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेऊन त्यामध्ये काम करू शकते. त्यामुळे आता प्रत्यक्षात ही बॅटरी खरंच इतका वेळ काम करेल की नाही हे पाहण्याची उत्सुकता आहे. अगदी काही नाही तर निदान थोड्या वर्षांसाठी जरी बॅटरी टिकून राहिली, तरीही स्मार्टफोन बॅटरीजच्या क्षेत्रात भरपूर प्रगती होऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे असल्याची माहिती, न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.

Story img Loader