रोबोट या संकल्पनेवर आधारित अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काही खास गोष्टी दाखवल्या जातात. रोबोट माणसांप्रमाणे काम, जेवण, व्यायाम किंवा डान्स करतो आदी अनेक गोष्टी तुम्ही टीव्हीवर पहिल्या असतील. तसेच सर्व वयोगटातील लोकांना वर्षानुवर्षे असे चित्रपट पाहायला आवडतात. तर एलॉन मस्क ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. एलॉन मस्कने अलीकडेच ऑप्टिमस जेन २ (Optimus Gen 2) चे अनावरण केले आहे. हा एक मानवीय रोबोट, जो फक्त चालणे आणि बोलणे यापेक्षा बरेच काही करू शकतो. अपग्रेड केलेल्या रोबोटमध्ये वेगात धावणे, हात आणि बोट यांच्या हालचाली, स्पर्श, संवेदना, कारखान्यात काम करणे आणि बऱ्याच काही खास गोष्टी उपलब्ध आहेत. ऑप्टीमससाठी ही एक महत्वपूर्ण प्रगती आहे. कारण- एक वर्षांपूर्वी रोबोट मदतीशिवाय चालू शकत नव्हते.
टेस्ला डिझाइन केलेला ऑप्टिमस जेन २ रोबोटमध्ये काय असेल खास :
१. स्वतःचे हात आणि पाय कॅलिब्रेट करण्यास सक्षम आहे.
२. रोबोटमध्ये २-डीओएफ (2-DoF) सक्रिय मान, तर ११-डीओएफ (11DoF) ब्रँड न्यू वेगवान हात; नाजूक आणि मजबूत वस्तू उचलण्यासाठी मदत करते.
३. रोबोटमध्ये फूट फोर्स आणि टॉर्क सेन्सिंग आहे, त्यामुळे हा योगा आणि डान्सदेखील करू शकतो.
४. आधीच्या रोबोटपेक्षा याचे १० किलो वजन कमी असल्यामुळे हा ३० टक्के वेगात धावू शकतो.
५. तसेच संपूर्ण शरीरावर नियंत्रणात ठेवतो. (Improves balance and full-body control)
एलॉन मस्कने टेस्लाच्या ऑप्टिमस जेन २ रोबोटचा एक डेमो व्हिडीओ त्यांच्या अधिकृत @elonmusk या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच ‘ऑप्टिमस’ असे एका शब्दात त्यांनी कॅप्शन लिहिली आहे. डेमो व्हिडीओ रोबोटच्या मागच्या दोन वर्षांतील आवृतींसह सुरू होतो, जे २०२२ आणि २०२३ च्या मार्चमध्ये सादर केले गेले होते. आता नवीन रोबोट व्यायाम करू शकतो, अंडी उकळवू शकतो आणि डान्सदेखील करू शकतो. रोबोटचे यंदाचे स्टायलिश डिझाइन अगदी माणसासारखे दिसते आहे.
हेही वाचा…माणसांप्रमाणे ऐकू अन् बोलू शकतो मेटाचा ‘हा’ Ray Ban! पाहा खास फीचर्स….
व्हिडीओ नक्की बघा :
ऑप्टिमसच्या गेल्या वर्षीच्या दोन रोबोटबद्दलची माहिती :
टेस्ला ऑप्टिमस, ज्याला टेस्ला बॉटदेखील म्हणतात. टेस्लाद्वारे विकसित केलेला हा एक मानवीय रोबोट आहे. २०२१ मध्ये कंपनीच्या एआय (AI) डे इव्हेंटमध्ये हे पहिल्यांदा घोषित करण्यात आले होते. २०२२ मध्ये टेस्लाने एक प्रोटोटाइप अनावरण केला होता ; जो चालू शकतो आणि वस्तू उचलण्यासारखी सोपी कामे करू शकतो. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी २०२२ मध्ये सांगितले होते की, रोबोट टेस्ला संगणक चिपद्वारे समर्थित होता. स्मार्टफोन प्रमाणेच ते वायफाय आणि एलटीईसह कनेक्ट केलेला असतो. ज्यामुळे रिमोट अपडेट्ससह रोबोटवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. तसेच मशीनला इंधन पुरवणारी बॅटरीसुद्धा खूपच कार्यक्षम आहे. त्यामुळे वारंवार त्यांना रिचार्ज करावे लागत नाही. त्यानंतर या वर्षी मार्चमध्ये, ओप्टिमस जेन १ (Optimus Gen 1) चे अनावरण करण्यात आले आणि सप्टेंबरमध्ये या रोबोटबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली होती; तर आता टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी नवीन जनरेशनचे ऑप्टिमस जेन २ रोबोटचे अनावरण केले आहे ; ज्यात खूप खास गोष्टी आहेत.