नवनवीन फीचर्स, सुंदर रंग, शक्तिशाली बॅटरी आणि कॅमरा यांच्यासह येणाऱ्या Poco X6 सीरिजच्या किमती मात्र प्रत्येकाच्या खिशाला परवडणाऱ्या आहेत असे समजते. पोकोच्या आधीच्या स्मार्टफोनमुळे या नव्या सीरिजमध्ये काय वेगळे असणार आहे, हे सर्वांना जणून घ्यायचे होते. या स्मार्टफोनचे प्री-बुकिंगदेखील सुरू झाले आहे. त्यामुळे Poco X6 सीरिजच्या सर्व खासियत, किमती आणि ग्राहकांना तो कधी खरेदी करता येणार आहे, याबद्दल माहिती घेऊ.

Poco X6 आणि Poco X6 Pro

यांचे बेस मॉडेल हे पॉवर्डबाय Snapdragon 7s Gen 2 चिप असेल, तर प्रो मॉडेल हे मीडिया MediaTek Dimensity 8300-Ultra SoC वर काम करणार आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये १.५ K रिसोल्यूशनसह AMOLED displays देण्यात आला असून, OIS आणि EIS यांच्यासह ६४ मेगापिक्सेलचा ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.The Poco X6 मध्ये ५,१००mAh शक्तीची बॅटरी असून, X6 Pro ५०००mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. दोन्हीही बॅटरी ६७W चार्जिंगला सपोर्ट करते.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

हेही वाचा : अखेर प्रतिक्षा संपली! Samsung च्या नव्या स्मार्टफोनचे प्री-रिझर्व्ह सुरू, पाहा खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार

स्क्रीन आणि स्पेसिफिकेशन

Poco X6 आणि Poco X6 Pro अँड्रॉइड १४ HyperOS यावर काम करणाऱ्या या दोन्ही फोनमध्ये, ड्युअल नॅनो सिमकार्ड बसवले जाऊ शकते. यामध्ये १.५ रिझोल्युशन ६.६७ इंच (१,२२० x२,७१२ पिक्सेल्स) डिस्प्ले आणि १२०Hz रिफ्रेशरेट, १,८०० नीट्स ब्राईटनेस असणार आहे.
Poco X6 Pro, MediaTek’s Dimensity 8300-Ultra SoC वर काम करणार असून, Poco X6 मध्ये Snapdragon 7s Gen 2 चिप बसवलेली आहे. या स्मार्टफोन सीरिजमध्ये १२GB रॅम + ५१२GB स्टोरेज उपलब्ध असणार आहे.

कॅमेरा

दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सेल OIS मुख्य कॅमेरा असणार आहे. ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा बसवण्यात आला आहे. उत्तम सेल्फी, व्हिडीओ कॉलसाठी यामध्ये १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

Poco X6 आणि Poco X6 Pro या स्मार्टफोनमध्ये सी टाईप पोर्ट बसवलेला असून, हेडफोनसाठी स्टॅंडर्ड ३.५mm जॅक दिला आहे. Poco X6 मध्ये ५,१००mAh बॅटरी असून, Poco X6 pro या फोनमध्ये मात्र ५,०००mAh इतक्या शक्तीची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्हीही फोन ६७W चार्जिंगला सपोर्ट करतात.

हेही वाचा : फ्लिपकार्टचा Republic Day Sale ‘या’ तारखेपासून होणार सुरू! ग्राहकांना आयफोनपासून ‘या’ उत्पादनांवर मिळणार भरघोस सूट

किंमत

Poco X6 ८GB + २५६GB स्टोरेज असणारा फोन १८,९९९ रुपयांना उपलब्ध असेल
तर १२GB रॅम + २५६GB स्टोरेज असणारे मॉडेल २१,९९९ रुपयांना मिळणार आहे
१२GB रॅम + ५१२ GB इनबिल्ट स्टोरेज असणारे मॉडेल २२,९९९ रुपयांना मिळणार आहे.
या फोनमध्ये, ब्लॅक मिरर आणि स्नोस्टॉर्म व्हाईट असे दोन रंग उपलब्ध असणार आहेत.

Poco X6 Pro ८GB रॅम + २५६GB स्टोरेज कॉन्फिगरेशन असणारा स्मार्टफोन २४,९९९ रुपयांना उपलब्ध असेल.
तर १२GB रॅम + ५१२GB स्टोरेज असणारे मॉडेल २६,९९९ रुपयांना मिळणार आहे.
पिवळा, रेसिंग ग्रे, स्पेक्टर ब्लॅक असे तीन रंग या स्मार्टफोनमध्ये आपल्याला दिसणार आहेत.

Poco X6 सीरिजचे स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना फ्लिपकार्टवर १६ जानेवारीपासून विकत घेता येणार आहेत. आयसीआयसीआय बँकेचे कोणतेही कार्ड वापरल्यास ग्राहकांना २००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट म्हणजेच त्वरित सूट मिळणार आहे, अशी माहिती गॅजेट्स ३६० च्या एका लेखावरून समजते.