कोणतीही पेमेंट करण्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीचा आधार घेतो. अगदी मोबाईल रिचार्जपासून महिन्याच्या किराण्याचे पेमेंट आपण ऑनलाईनच करतो. याप्रमाणेच कोणत्याही गोष्टीची मागिती मिळवण्यासाठी पटकन गुगलचा आधार घेतो. या गोष्टी आपल्या सवयीचा भाग झाल्या आहेत. ऑनलाईन पेमेंट करण्याच्या सुविधेमध्ये, गुगल सर्चशी निगडित १ जानेवारीपासून काही बदल होणार आहेत. कोणते आहेत ते बदल जाणून घ्या
१ जानेवारीपासून होणारे बदल
गुगल क्रोम
गुगलकडुन क्रोम सपोर्टबाबत एक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. १ जानेवारीपासून विंडोज ७ आणि विंडोज ८.१ साठी गुगल क्रोमचे नवे वर्जन सपोर्ट बंद करण्यात येईल. म्हणजेच ज्यांच्या लॅपटॉपमध्ये विंडोज ७ आणि विंडोज ८.१ आहे, त्यांना गुगल क्रोम वापरता येणार नाही.ज्यांचे लॅपटॉप जुने आहेत, त्यांना याची अडचण येऊ शकते.
आणखी वाचा: WhatsApp वर ख्रिसमसची टोपी मिळवण्यासाठीचे भन्नाट फीचर पाहिले का? कसे वापरायचे जाणून घ्या
ऑनलाईन पेमेंट
१ जानेवारीपासून ऑनलाईन पेमेंट करताना प्रत्येकवेळी कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट द्यावी लागणार, म्हणजेच या डिटेल्स आधीसारख्या सेव्ह राहणार नाहीत. आरबीआयच्या गाईडलाईननुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन पेमेंट सुविधा अधिक सुरक्षित व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्टेडीया गेमिंग सर्विस
गुगल स्टेडीया गेमिंग सर्विस ही एक क्लाउड गेमिंग सर्विस आहे, जानेवारीपासून ही सुविधा बंद होणार आहे. १८ जानेवारीपर्यंत ही सुविधा लाईव्ह उपलब्ध असेल, त्यानंतर बंद होईल. गुगल स्टेडीया गेमिंग सर्विसला लोकप्रियता न मिळाल्याने ही सुविधा बंद होत आहे.