वनप्लस या स्मार्टफोनची OnePlus 12 ही सीरिज येत्या २३ जानेवारी २०२४ रोजी भारतामध्ये लाँच होणार आहे. त्याच दिवशी OnePlus buds ३ देखील लाँच होणार आहे. परंतु, चिनी मार्केटमध्ये आधीच हे स्मार्टफोन लाँच झाले आहेत. त्यानुसार आपण भारतामध्ये OnePlus 12 सीरिजची किंमत काय असू शकते याचा अंदाज बांधू शकतो. तर या स्मार्टफोनमधील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स काय आहेत ते पाहूया.

OnePlus 12 आणि 12R असे दोन मॉडेल्स वनप्लसच्या नव्या सीरिजमध्ये उपलब्ध होणार आहेत. दोघांच्या किमती, स्टोरेज, कॅमेरा या सर्वांबद्दल जाणून घ्या.

capacity of 200 e-bus charging stations in the ST fleet will also increase in one year
एसटीच्या ताफ्यात वर्षभरात २०० ई-बस चार्जिंग स्टेशनची क्षमताही वाढणार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mumbai, Increase in PM 2.5 levels,
मुंबईत पीएम २.५ च्या पातळीत वाढ
Realme 14 Pro 5G Series Launch in India
नवा फोन घ्यायचा विचार करत असाल तर जरा थांबा! रिअलमीचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात होणार लाँच; थंड तापमानात रंग बदलणार
Nashik Mandal of mhada is not getting houses from private developers under 20 percent scheme
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ५५५ घरांसाठी सोडत २० टक्के योजनेतील घरे, आठवड्याभरात जाहिरात
Zomato Zepto Swiggy field workers have no legal rights
किती काळ पायदळीच तुडवले जाणार? ‘१० मिनिटांत घरपोच’ देणाऱ्यांचे हक्क
apple siri users private voice recorded
Apple च्या Siri वर युजर्सचं खासगी संभाषण रेकॉर्ड; ९.५ कोटी डॉलर दंड भरणार; तक्रारदारांना मिळणार प्रत्येकी ‘इतकी’ रक्कम?
states fund raise loksatta news
कर्ज उभारणीसाठी राज्यांकडून तिमाहीत चढाओढीने बोली शक्य, उसनवारी ४.७३ लाख कोटींवर जाण्याचा, दरही महागण्याचा अंदाज

OnePlus 12

चीनमधील OnePlus 12 व्हेरियंट हा पॉवर्डबाय Qualcomm Snapdragon 8 Gen 3 chipset असल्याने अत्यंत उत्कृष्ट काम करतो. त्यासह AI टास्कदेखील सहजतेने त्याला करता येतात. तसेच यामध्ये १६ GB रॅम आणि ५१२GB इतके स्टोरेज आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये ६.८२ इंचाचा LTPO AMOLED पॅनल तंत्रज्ञान वापरणारा डिस्प्ले आणि २K रिसोल्यूशन + १२०nits ब्राईटनेस आहे, त्यामुळे स्क्रीनवर कोणतीही गोष्ट पाहताना वापरकर्त्याला अतिशय सुंदर अनुभव मिळू शकतो.

हेही वाचा : भन्नाट शोध! एका चार्जिंगमध्ये ५० वर्ष चालणारी बॅटरी; कुठे तयार होत आहे जाणून घ्या…

कॅमेरा –
हसल्ब्लेड [Hasselblad] ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप बसवण्यात आला आहे. ज्यामध्ये ४८MP वाईड अँगल लेन्स, ४८MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, ६४MP टेलिफोटो लेन्स आणि ३x टेलिफोटोची क्षमता असणारी लेन्स देण्यात आली आहे, तर सेल्फी आणि उत्तम दर्जाच्या व्हिडीओ कॉलसाठी ३२MP फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.

बॅटरी –

OnePlus 12 मध्ये ५,४००mAh बॅटरी बसवण्यात आलेली आहे, जी १००W इतक्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये सी टाईप यूएसबी पोर्ट दिलेला आहे. केवळ २६ मिनिटांमध्ये हा फोन ० ते १००% चार्ज होऊ शकतो. इतकेच नाही, तर ५०W गतीने वायरलेस चार्जिंगदेखील केले जाऊ शकते, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

हा फोन अँड्रॉइड १४ वर काम करत असून यामध्ये कस्टमाईझ्ड OxygenOS 14 इंटरफेस देण्यात आलेला आहे.

OnePlus 12R

OnePlus 12R६.७८ इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले, १२०Hz रिफ्रेश रेट आणि १.५K रिसोल्यूशनसह देण्यात आलेला आहे. ४,५००nits ब्राईटनेस तुम्हाला दिवसाच्या प्रकाशात, घराबाहेरदेखील स्क्रीन अगदी स्पष्टपणे दाखवण्यास मदत करतो.

हेही वाचा : Samsung चा नवीन स्मार्टफोन आयफोन १५ पेक्षाही भारी? काय आहेत दोघांमधील फरक जाणून घ्या…

हा स्पार्टफोन पॉवर्डबाय Qualcomm Snapdragon 8 Gen 2 chipset असून यामध्ये १६GB LPDDR5X रॅम देण्यात आला आहे, तर यामध्ये १TB UFS 4.0 स्टोरेज दिलेले आहे. यामुळे वापरकर्ते अत्यंत सुरळीत आणि बिनदिक्कत या फोनमध्ये कोणतेही ॲप किंवा गेम चालवू शकतात.

कॅमेरा –
OnePlus 12R ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप असल्याचे म्हटले जाते. अत्यंत स्पष्ट फोटो येण्यासाठी, यामध्ये हाय रिसोल्यूशनचा ५०MP मुख्य कॅमेरा असू शकतो. ८MP अल्ट्रा वाईड लेस, जवळून फोटो काढण्यासाठी २MP मॅक्रो सेन्सर बसवण्यात आलेला आहे, असे म्हटले जाते. उत्तम सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १६MP फ्रंट कॅमेरा बसवलेला आहे.

बॅटरी –

या स्मार्टफोनमध्ये ५५००mAh बॅटरी बसवली असून, हा फोनदेखील १००W SuperVOOC इतक्या गतीने फोन चार्ज करू शकतो. यामध्येही सी टाईप यूएसबी पोर्ट दिलेला आहे.

OnePlus 12 आणि OnePlus 12R अपेक्षित किंमत

OnePlus 12 हा स्पार्टफोन साधारण ६९,९९९ रुपयांना मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, The OnePlus 12R हे मॉडेल तुलनेने कमी किमतीत असण्याची शक्यता इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.
वनप्लसचे दोन्हीही फोन ॲमेझॉन या शॉपिंग साईटवर उपलब्ध होणार आहेत.

Story img Loader