गेल्या ५ महिन्यांत विवो एक्स८० सिरीज, शाओमी ११ आय हायपरचार्ज आणि रिऍलिटी जीटी निओ ३ असे काही उत्कृष्ट स्मार्टफोन लाँच झाले आहेत. परंतु, हा फक्त एक टीझर होता. वर्षातील अनेक प्रीमियम स्मार्टफोन लाँच होणे बाकी आहे. जूनमध्येही काही मनोरंजक फोन लाँच होणार आहेत. स्मार्टफोन कंपन्या पोको, रिअलमी, मोटोरोला, ओपो आणि विवो या महिन्यात वेगवेगळ्या किंमतींमध्ये त्यांचे स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज आहेत.
जूनमध्ये पोको एफ४ जीटी आणि ओपो रेनो८ प्रो सारखे मोठे लाँच होणार आहेत. जून २०२२ मध्ये कोणकोणते स्मार्टफोन लाँच होणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

विवो टी२ (Vivo T2)

विवो टी२सह याची टी सिरीज विस्तारण्यासाठी सज्ज आहे. याचं लाँचिंग ६ जून रोजी होणार होतं, परंतु काही कारणास्तव ते पुढे ढकलण्यात आलं. आता या महिन्याच्या शेवटी याचे लाँचिंग होण्याची शक्यता आहे. यामध्ये एफएचडी प्लस रिझोल्यूशन, १२० हर्डझ रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेटसह ६.६२ इंच ओएलईडी पॅनेलसह येण्याची अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन आयक्यूओओ निओ६ एसईचा रिब्रँडेड व्हर्जन देखील असू शकतो, जो गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच झाला होता. त्याची किंमत २५००० रुपयांपेक्षा कमी असेल.

Google ला टक्कर देण्यासाठी Apple लवकरच आणणार स्वतःचे सर्च इंजिन; जाणून घ्या तपशील

पोको एफ४ जीटी (Poco F4 GT)

पोको एफ४ जीटी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. हा युरोपमध्ये आधीच लाँच झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फोनची लाँचिंगची कधी होणार याची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी कंपनीने खुलासा केला आहे की हा स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे. हँडसेटमध्ये फुल-एचडी प्लस स्क्रीन रिझोल्यूशनसह ६.६७ इंचाचा एएमओएलईडी डिस्प्ले, १२०हर्डझ रिफ्रेश रेट आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन प्रोसेसर, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी अंतर्गत स्टोरेज असेल. त्याची किंमत ४२००० रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

ओपो रेनो ८ प्रो (Oppo Reno8 Pro)

ओपो रेनो सिरीज नेहमीच तिच्या लुक आणि फीचर्सने यूजर्सना प्रभावित करते. अलीकडेच, कंपनीने या ओपो रेनो८ सिरीजमध्ये एक नवीन सदस्य जोडला आहे. हा हँडसेट नुकताच चीनमध्ये लाँच करण्यात आला असून जूनमध्ये जागतिक बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे. ओपो रेनो८ प्रो मध्ये १२०हर्डझ स्क्रीन रिफ्रेश रेटसह सॅमसंग कडून ६.६२-इंचाचा ई४ एएमओएलईडी डिस्प्ले असेल. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जनरेशन चिपसेट १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी अंतर्गत स्टोरेजसह येणारा हा पहिला फोन असेल.

एकाच फोनमध्ये कसे वापरायचे दोन Whatsapp आणि Instagram अकाउंट्स? फॉलो करा ‘या’ टिप्स

रिअलमी जीटी निओ ३ टी (Realme GT NEO 3T)

रिअलमी जीटी निओ ३ टी चे ७ जून रोजी लाँचिंग करण्यात आले आहे. हा हँडसेट ६.६२ इंच फुल एचडी+ एएमओएलईडी डिस्प्ले आणि १२०हर्डझच्या रिफ्रेश रेटसह लाँच करण्यात आला आहे. हे स्नॅपड्रॅगन ८७० ५जी चिपसेटसह येईल. याशिवाय, यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेन्सरसह ६४-मेगापिक्सलची प्राथमिक लेन्स, ८-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि २-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे.

मोटो जी८२ ५जी (Moto G82 5G)

मोटोरोलाने नुकतेच भारतात मोटो जी८२ ५जी लाँच केले. त्याच्या ६जीबी + १२८जीबी स्टोरेज वेरिएंटची भारतातील किंमत २१,४९९ रुपये आहे. हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेटसह येतो. यामध्ये एक ट्रिपल रिअर कॅमेरा मॉड्यूल आहे ज्यामध्ये ८-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि २-मेगापिक्सेल मॅक्रो स्नॅपरसह ५०-मेगापिक्सलची मुख्य लेन्स समाविष्ट आहे, तर फ्रंटला १६-मेगापिक्सेल लेन्स आहे.

Story img Loader