अनेक सोशल मीडिया अॅप एकमेकांशी स्पर्धा करत स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी रोज नवनवीन फिचर घेऊन येत असतात. तर यातच मेटाच्या मालकीचे अॅप व्हॉट्सअॅप आघाडीवर आहे. तर आता व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आणखीन एक सोयीस्कर फिचर घेऊन येत आहेत. वापरकर्त्यांना या नवीन फिचरचा खूप फायदा होणार आहे. काय असणार हे नवं फिचर पाहू…
व्हॉट्सअॅपने यापूर्वीच म्हणजे २०२१ मध्ये युजर्सच्या खासगी फोटो, व्हिडीओसाठी एक खास फिचर सादर केले. व्हॉट्सअॅपमध्ये युजरच्या चॅटमध्ये गेल्यावर कॅमेरा आयकॉनवर क्लिक करून फोटो किंवा व्हिडीओ सिलेक्ट करायचा. त्यानंतर एका वर्तुळात तुम्हाला एक हा आकडा दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर फोटो, व्हिडीओ ‘सेट टू व्ह्यू वन्स’ म्हणजे समोरचा युजर तुमचा फोटो फक्त एकदाच पाहू शकणार आणि त्याचा स्क्रीनशॉट किंवा इतरांना तो पाठवण्याची परवानगीसुद्धा त्याला नसणार. तर आता हे फिचर व्हॉट्सअॅप व्हॉईस मेसेजसाठीसुद्धा घेऊन येत आहे.
हेही वाचा…WhatsApp वर व्हिडीओ कॉलदरम्यान ऐकता येणार गाणी; पाहा काय आहे खास
व्हॉट्सअॅपने नुकतेच व्हॉईस मेसेजसाठी ‘व्ह्यू वन्स’ नावाचे एक नवीन फिचर सादर केले आहे; एकदा व्हॉईस मेसेज ऐकल्यावर तो चॅटमधून नाहीसा होणार. एका ब्लॉग पोस्टमध्ये व्हॉट्सअॅपने या नवीन फिचरची घोषणा केली आहे. व्हॉट्सअॅपने व्हॉईस मेसेजसाठी हा फिचर वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीसाठी डिझाईन केला आहे. तुम्ही व्हॉईस मेसेज पाठवताना व्ह्यू वन्स या आयकॉनवर क्लिक करा. या फिचरमुळे तुमचा व्हॉईस मेसेज इतर कोणालाही फॉरवर्ड केला जाणार नाही आणि समोरचा युजर फक्त एकदाच तुमचा व्हॉईस मेसेज ऐकू किंवा तो प्ले करू शकेल.
एकदाच प्ले होणारा व्हॉईस मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे तुमचा मेसेज रेकॉर्ड करावा लागेल, त्यानंतर तो पाठवण्यापूर्वी व्ह्यू वन्स या आयकॉनवर क्लिक करा. यामुळे समोरचा व्हॉट्सअॅप युजर तुमचा व्हॉईस मेसेज एकदाच ऐकू शकेल आणि नंतर त्यांच्या चॅट हिस्टरीमधूनसुद्धा ते अदृश्य होईल. व्हॉट्सअॅपवरील तुमच्या सर्व खासगी संदेशांप्रमाणे, एकदाच प्ले होणारे व्हॉइस मेसेज डिफॉल्टनुसार एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह संरक्षित केले जातात. याचा अर्थ असा की, स्वतः WhatsApp देखील ते पाहू किंवा ऐकू शकत नाही. तर आता व्हॉट्सअॅप सर्व वापरकर्त्यांसाठी हे भन्नाट फिचर घेऊन येईल. प्रत्येक युजर फोटो आणि व्हिडीओसह एकदा प्ले होणारे व्हॉईस मेसेजदेखील इतरांना पाठवू शकतील आणि पर्सनल गोष्टी सहज शेअर करू शकतील.