अलीकडच्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर वाढला आहे. सध्या यूपीआय ॲपच्या मदतीने कुठेही आणि कधीही सहज पेमेंट करण्यास मदत होते. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर काही सेकंदांत पैसे पाठवणे, रिसिव्ह करणे शक्य होते. तर आता यूपीआय ॲप ग्राहकांसाठी एक खास भन्नाट फीचर घेऊन येत आहे; ज्याच्या मदतीने ऑनलाइन व्यवहार करणे आणखीन सोपे होणार आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने जाहीर केले आहे की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सदस्यांना पुढील वर्षी म्हणजेच ३१ जानेवारी २०२४ पर्यंत पेमेंट करताना ‘टॅप ॲण्ड पे’ वापरण्याची सुविधा मिळणार आहे. त्याअंतर्गत तुम्हाला तुमच्या मोबाइल पेमेंट मशीनला स्पर्श करावा लागेल आणि मग पेमेंट आपोआप होणार आहे. नवीन पेमेंट पद्धत बीएचआयएम (BHIM), जीपे (Gpay), पेटीएम (Paytm), फोन पे (PhonePe) आणि इतर यूपीआय UPI ॲप्सच्या वापरकर्त्यांना मदत करील. यूपीआय ‘टॅप ॲण्ड पे’ हे सप्टेंबर २०२३ मध्ये यूपीआय पेमेंटचे अतिरिक्त फीचर म्हणून लाँच करण्यात आला होते; जसे की स्कॅन आणि पे, पे टू कॉन्टॅक्ट इत्यादी.
हेही वाचा…नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जिओने ग्राहकांसाठी लाँच केला ‘हा’ हटके प्लॅन; जाणून घ्या…
टॅप आणि पे पेमेंट फीचर वापरण्यासाठी ग्राहकाच्या डिव्हाइसमध्ये NFC क्षमता असावी. प्राप्तकर्त्याचा यूपीआय आयडी हा साउंड बॉक्स किंवा यूपीआय स्मार्ट टॅगमधील एनएफसी टॅगमध्ये लिहिलेला असतो. जेव्हा युजर समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवतो तेव्हा फोन NFC QRs किंवा ध्वनीबॉक्सवर टॅप करतो, तेव्हा प्राप्तकर्त्याचा यूपीआय आयडी पेअर ॲपद्वारे प्राप्त केला जातो. तसेच व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसला इंटरनेटची आवश्यकता आहे. टॅप आणि पे फीचर हे ग्राहकांसाठी बाय डीफॉल्ट सक्षम असेल.
सध्या बीएचआयएम (BHIM) व पेटीएम (Paytm) हे ॲप्स ‘टॅप आणि पे’ फीचरला सपोर्ट करतात. ‘टॅप ॲण्ड पे’ फीचर कसे वापरायचे ते पाहू…
१. यूपीआय ॲप उघडा : तुमचा यूपीआय (UPI) ॲप्लिकेशन उघडून सुरू करा. हे बीएचआयएम (BHIM) किंवा पेटीएम (Paytm)सारख्या ‘टॅप ॲण्ड पे’ फीचरला सपोर्ट करणारे कोणतेही ॲप असू शकते.
२. टॅप आणि पे आयकॉन निवडा : तुमच्या UPI ॲपवर ‘टॅप आणि पे’ आयकॉन शोधा आणि त्यावर क्लिक करा.
३. रक्कम लिहा : तुम्ही समोरच्या युजर्सला पाठवू इच्छित असलेली रक्कम तिथे लिहा.
४. प्राप्तकर्त्याच्या डिव्हाइसवर तुमचे डिव्हाइस टॅप करा : तुमचा डिव्हाइस प्राप्तकर्त्याच्या डिव्हाइस जवळ आणा आणि त्यावर टॅप करा. दोन्ही उपकरणांमध्ये NFC क्षमता आहे का याची एकदा खात्री करा. नंतर ॲपने विनंती केल्यास पिन एंटर करा आणि एंटर दाबा
५. व्यवहार यशस्वी : जर सर्व काही ठीक झाले, तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुमचा व्यवहार यशस्वी झाला आहे, असा संदेश दिसला पाहिजे.
(टीप : प्राप्तकर्त्याला त्यांच्या खात्यात पैसे प्राप्त करण्यासाठी कधीही त्यांचा UPI कोड किंवा कोणताही कोड प्रविष्ट करण्याची गरज भासत नाही.)