Noise ColorFit Loop smartwatch launched in india : स्मार्टवॉच घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त स्मार्टवॉच उपलब्ध झाली आहे. नॉइसने भारतात तिची ColorFit Loop ही ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच लाँच केली आहे. ही वॉच सहा रंग पर्याय आणि एक वर्षाच्या वॉरंटीसह सादर करण्यात आली आहे.
ColorFit Loop स्मार्टवॉच हलकी असून तिचे वजन केवळ ३७.९ ग्राम आहे. घड्याळीत सिलिकन स्ट्रॅप असून तो २२.६ मिमी रुंद आहे. त्याच्या बाजूला बटन देण्यात आली आहे ज्याद्वारे तुम्ही ही घड्याळ ऑपरेट करू शकता. या घड्याळीत कोणते फीचर्स देण्यात आले आहेत? याबाबत जाणून घेऊया.
किंमत
Noise ColorFit Loop स्मार्टवॉच फ्लिपकार्ट आणि गोनॉइस.कॉमवर २४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही घड्याळ जेट ब्लॅक, ऑलिव्ह ग्रीन, मिडनाइट ब्ल्यू, मिस्ट ग्रे, डीप वाइन आणि रोज पिंक या रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
(मोठ्या स्क्रीनवर पाहा व्हिडिओ, फोनला WIRELESS पद्धतीने टीव्हीशी करा कनेक्ट, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)
फीचर्स
नॉइस करलफीट घड्याळात १.८५ इंच २.५ डी कर्व्ह डिस्प्ले, २०० फेस वॉच फेसेस देण्यात आले आहेत. घड्याळीला आयपी ६८ रेटिंग मिळाले आहे जे पाणी आणि धुळीपासून संरक्षणाची खात्री देते. ही घड्याळ नॉइसफीट अॅपद्वारे आयओएस आणि अँड्रॉइड डिव्हाइसला सहजपणे जोडता येते. या घड्याळीद्वारे ब्लूटूथ कॉलिंग देखील करता येते.
घड्याळीत ३९० एमएएच बॅटरी देण्यात आली असून ती सिंगल चार्जमध्ये ७ दिवस चालते असा कंपनीचा दावा आहे. घड्याळ पूर्णपणे चार्ज होण्यासाठी दोन तास लागतात. सिंगल चार्जमध्ये स्टँडबायमोडवर ३० दिवसांची बॅटरी लाइफ मिळते, असा कंपनीचा दावा आहे. तुम्हाला घड्याळात १० कॉन्टॅक्ट्स देखील सेव करता येतील. त्याचबरोबर, घड्याळात १३० स्पोर्ट मोड आणि नॉइस हेल्थ सूट मिळतो जो SPO2 पातळी, हृदय गती आणि इतर सर्व गोष्टींचा मागोवा घेतो.