प्रवासादरम्यान गाणे ऐकून वेळ घालवणे प्रत्येक प्रवाशाला आवडते. यादरम्यान अनेकदा आपण इअरफोन्सचा वापर करतो. पण, ट्रेन, बसमधून प्रवास करताना वायरलेस इअरबड्स वापरणे शक्य नसते. कारण- ते कोणाचाही धक्का लागून स्टेशन किंवा ट्रेनमध्ये पडू शकतात. त्यामुळे अनेक जण नेकबँडचा उपयोग करतात. पण, वायरलेस इअरबड्स आणि नेकबँड हे ग्राहकांना वेगवेगळ्या कंपनीचे खरेदी करावे लागतात. तर आता या दोन्ही सुविधा तुम्हाला एकाच इअरपॉड्समध्ये मिळणार आहेत.
नॉइज कंपनीने भारतातील पहिले ‘नॉइज प्युअर पॉड्स’ OWS लाँच केले आहे. कंपनीने याला एअरवेव्ह तंत्रज्ञानासह भारतातील पहिला ओपन वायरलेस स्टीरीओ (OWS) असल्याचे म्हटले आहे. तसेच हा १९ डिसेंबर रोजी म्हणजेच आज लाँच करण्यात आला आहे. हे इअरपॉड्स पॉवर ब्लॅक व झेन बेज या दोन रंगांत उपलब्ध आहेत. हे स्मार्ट इअरपीस ग्राहकांना अतुलनीय सुविधा प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
हा खास इअरपॉड्स प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. नॉइज प्युअर पॉड्सची केवळ gonoise.com वर प्री-बुकिंग होऊ शकते. तसेच हे इअरपॉड्स पॉवर ब्लॅक व झेन बेज या दोन रंगांमध्ये फ्लिपकार्ट आणि gonoise.com वर २,९९९ च्या लाँच किमतीवर मिळू शकतील. खास गोष्ट अशी की, तुम्ही नॉइज प्युअर पॉड्स ४९९ रुपयांमध्ये प्री-बुक केले जाऊ शकतात. जर तुम्ही ते प्री-बुक तकेले, तर तुम्हाला कंपनीकडून पॉड्सवर ८०० रुपयांची सूट मिळेल. एवढेच नाही, तर तुम्ही Pure Pods बुक केल्यास तुम्हाला Pro 5 स्मार्टवॉच उपकरणावरही १०० रुपयांची सूट मिळू शकते.
तसेच हे इअरपॉड्स नेकबँड किंवा ब्लूटूथ म्हणूनदेखील तुम्ही वापरू शकणार आहात. इयरबड 16mm डायनॅमिक ड्रायव्हर्ससह येतात. हे उपकरण नॉइज एअरवेव्ह तंत्रज्ञानासह आणण्यात आले आहे. वापरकर्त्याला इअरपॉड्समध्ये टच कंट्रोल सपोर्ट मिळतो; ज्याच्या मदतीने कॉल आणि गाणे ऐकण्यासाठी फोन वापरण्याची गरज भासणार नाही. इअरपॉड्सचे IPX5 वॉटर रेझिस्टन्स रेटिंग फिटनेस अॅक्टिव्हिटी आणि मैदानी खेळांसाठी अतिशय उपयोगी ठरेल.
नॉइज प्युअर पॉड्सचे फीचर :
नॉइज प्युअर पॉड्सचे वेगळे फीचर म्हणजे हे प्युअर पॉड्स इअरपॉड्स क्वाड माइक व्यवस्थेसह ENC (एनव्हायर्न्मेंटल नॉइज कॅन्सलेशन) सपोर्टसह येतात आणि या इअरपॉड्समध्ये आकर्षक डिझाइनसुद्धा आहेत. इअरपॉड्स घातल्यावर तुम्हाला आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही. प्युअर पॉड्स कनेक्टिव्हिटीसाठी ब्ल्यूटूथ ५.३ सह बनवण्यात आले आहेत. नवीन इअरपॉड्सबाबत कंपनीचा दावा आहे की, फक्त १० मिनिट चार्जिंग केल्यानंतर हे इअरपॉड्स ८० तास काम करतात.