सध्याचा काळामध्ये वायरलेस इअरबड्स आणि नेकबॅंचा वापर मोठ्या प्रमाणात केला वाजतो. यामध्ये ब्लूटूथच्या माध्यमातून ते मोबाइलला कनेक्ट केले जातात. गाडीवर असताना किंवा प्रवासात आणि अन्य कामामध्ये त्याच चांगला उपयोग होतो. अनेक कंपन्यांनी आपले वायरलेस इअरफोन बाजारात लॉन्च केले आहेत. त्यातच आता noise कंपनीने आपले Air Buds Mini 2 ट्रू वायरलेस स्टीरियो’ (TWS) इअरफोन भारतात लॉन्च केले आहेत. ज्या किमतीत कंपनीने Noise Air Buds Mini 2 लॉन्च केले आहे, ते खरेदी करण्यास कोणीही मागेपुढे पाहणार नाही.
Air Buds Mini 2 ला ब्लूटूथ ५.३ कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच हे इअरफोन्स वेगाने चार्ज होतात. चार्जिंग केससह हे इअरफोन्स ४५ तासांची बॅटरी लाईफ देतात असा कंपनीचा दावा आहे. हे इअरफोन Calm Beige, Jet Black, Snow White आणि Space Blue या रंगांमध्ये लॉन्च केले गेले आहेत. या इअरफोन्सला IPX5 रेटिंग दिले असून यामुळे हे पाण्यामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात वाचतात. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.
Air Buds Mini 2 चे फीचर्स
नॉइज Air Buds Mini 2 इअरफोन्समध्ये १३ मिमीचे ड्रायव्हर्स बसवण्यात आले आहेत. गेमिंग दरम्यान हे ५० ms कमी लेटन्सी मोडे ऑफर करते असा दावा केला गेला आहे. ब्लूटूथद्वारे कनेक्ट केल्यावर १० मीटरपर्यंत रेंज मिळते. नॉईज Air Buds Mini 2 इअरफोनस्मध्ये कंपनीची हायपर सिंकी टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यामुळे इअरफोन्स तुमच्या डिव्हाईसशी लगेच कनेक्ट होतात. यामध्ये ४ मायक्रोफोन देण्यात आले आहेत. तसेच व्हॉइस कॉल दरम्यान नॉइज कॅन्सलेशन सपोर्ट देण्यात आला आहे.
एकदा चार्ज केले की या इअरफोन्सला ४५ तासांची बॅटरी लाईफ मिळते असा दावा करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीचे ‘इन्स्टाचार्ज’ तंत्रज्ञान देखील देण्यात आले आहे. जे केवळ १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १२० मिनिटाचा प्लेबॅक देते. चार्जिंग केसमध्ये एलईडी चार्जिंग इंडिकेटर आहे. तसेच यूएसबी पोर्ट टाईप-सी देण्यात आले आहे.
हेही वाचा : VIDEO: प्री-ऑर्डरवर ३ हजारांचा डिस्काउंट, ५० मेगापिक्सल कॅमेरा; Nothing कंपनीकडून ‘हा’ स्मार्टफोन लॉन्च
Air Buds Mini 2 ची किंमत आणि उपलब्धता
Noise Air Buds Mini 2 ची किंमत कंपनीकडून ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हे इअरफोन्स थेट बोल्ट Audio AirBass Y1 आणि बोट Airdopes 111 शी स्पर्धा करतील.